Home / विदर्भ / अकोला / *सर्वोपचार रुग्णालयातील...

विदर्भ    |    अकोला

*सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा - उमेश इंगळे* *अधिष्ठाता यांची हकालपट्टी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार*

*सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा - उमेश इंगळे*    *अधिष्ठाता यांची हकालपट्टी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार*

*सर्वोपचार रुग्णालयातील असुविधेला जबाबदार अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा - उमेश इंगळे*

 

अधिष्ठाता यांची हकालपट्टी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

 

✍️उमेश इंगळे

   अकोला

 

अकोला:-पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या सर्वोउपचार रुग्णालयात वैद्यकीय सुविधा बंद आहेत परिणामी रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असुन रुग्णांची गैरसोय होत आहे. सिटी स्कॅन, एमआरआय,कॅथलॅब ,सिएसएसडी (स्टरलायजेशन),२ डी इको,टिएमटी मशिन,आदि अत्यंत महत्त्वाच्या सुविधा बंद आहेत तसेच सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर ओपिडि मध्ये वेळेवर येत नाहीत, डॉक्टर उपचारात हलगर्जीपणा करतात डॉक्टर ची तक्रार केली तर रुग्णांला व त्यांच्या नातेवाईकांना धाकधटप करतात,वार्ड नं २२ मधिल एका महिला डॉक्टर ची अमितकुमार तायडे नामक व्यक्तीने तक्रार केली तरिही त्यांच्या वर काहिच कारवाई केली नाही, डॉक्टर श्यामकुमार सिरसाम हे विना परवानगी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेतात त्या शिबिरात विनापरवानगी शस्त्रक्रिया करतात हे अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांनी दिलेल्या अहवालात नमूद असुन सुद्धा त्यांच्यावर  अद्याप पर्यंत काहीच कारवाई केली. नाही सर्वोपचार रुग्णालयात वार्ड क्रं २२ मध्ये रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन ही काहीच कारवाई नाही, सर्वोउपचार रुग्णालयातील वार्डात साफसफाई नाही,एका महिलेने आत्महत्या केली तरीही संबंधित कर्मचाऱ्यांनवर काहिच कारवाई केली नाही , रुग्णांला कोणता वार्ड कुठे आहे याची माहिती नाही यासाठी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे तरीही लावले नाही, अधिष्ठाता यांच्या कार्यालयाच्या बाजुला असलेले शौचालय बंद करून ठेवले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, सर्वोपचार रुग्णालय आवारातच कचरा जाळला जातो.कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने व्हिलेवाट लावणे आवश्यक असतांना परिसरातील कचरा त्याच ठिकाणी जाळण्याच्या प्रकारामुळे वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे तरीपण

सर्वोउपचार रुग्णालयातील डॉक्टर नर्स कर्मचारी यांच्यावर अधिष्ठाता यांचा धाक उरलेला नाही सुपरस्पेशालिटी फक्त शोभेची वास्तू बनुन पडुन आहे.रोजच कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात सर्वोउपचार रुग्णालयातील भोंगळ कारभाराविषयी बातमी प्रकाशित होत असते. याआधी पण सर्वोपचार रुग्णालयातील भोंगळ कारभाराविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कर्तव्यात कसूर करणाऱ्या, हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या व रुग्णालयातील ढिसाळ नियोजन,व असुविधेला जबाबदार असणाऱ्या डॉ मिनाक्षी गजभिये यांची तात्काळ हकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांच्या मार्गदर्शनात उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख समीर खान, ॲड रोशन तायडे , सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले आदी रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...