Home / विदर्भ / नागपूर / *नोटिसा मागे घ्या, अन्यथा...

विदर्भ    |    नागपूर

*नोटिसा मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा*

*नोटिसा मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा*

*नोटिसा मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा*

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

नागपूर दि. २५ :- राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पिके करपायला लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नाही. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या मानगुटीवर बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा असल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला.

महायुती सरकारने नोटिसा मागे घ्याव्यात अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. या नोटिसांना घाबरून न जाता त्या आपल्याकडे पाठवून देण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी करुन वडेट्टीवार यांनी शेतकर्‍यांना दिलासा दिला. बँकांच्या नोटिसांना स्थगिती देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

राज्यात जून,लजुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दिनांक १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ४२ टक्के,  मराठवाड्यात २८ टक्के, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांत पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. ही विदारक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. पिके

हातातून गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात येत आहेत. यावरुन

शेतकरी, शेतमजूर यांच्यप्रति शिंदे- फडणवीस-पवार-(अजित) सरकार बोथट झाले असून ते सरकार भावनाशून्य झाले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. पीकविमा कंपन्यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खतांचा काळाबाजार, बियाणांची टंचाई, बोगस बियाणे आणि खतांचा सुळसुळाट असतानाही शेतकर्‍यांनी प्रतिकूल परिस्थितीत

पैसे उभे करुन पिके घेण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे कृषीमंत्री बीडच्या सभेत व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री सूटबुट घालून जपानला गेले आहेत आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली कोण? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा येत आहेत. दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकार त्यांना एवढा जाच का देत आहे?  असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. अजित पवार आजपर्यंत नोटिसा आल्यानंतर भूमिका मांडत होते तेही आता गप्प बसले आहेत. या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करुन रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो, हे दाखवून देण्याचा निर्धारही वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांनी बँकेकडून येणाऱ्या नोटिसांना घाबरून न जाता त्या आपल्याकडे पाठवून द्या असे आवाहन करुन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे खंबीरपणे राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...