Home / यवतमाळ-जिल्हा / वणी पोलिस व स्थानिक...

यवतमाळ-जिल्हा

वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी वाहन चोरट्यांना पकडून ४ मोटरसायकल केल्या जप्त.

वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी वाहन चोरट्यांना पकडून ४ मोटरसायकल केल्या जप्त.
ads images

वणी:- वणी परिसरात  मागील काही महिन्यांपासून  दुचाकी वाहन चोरीचे  प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

त्या अनुषंगाने वणी पोलिस स्टेशन चे  ठाणेदार अजिज जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे करीता संयुक्त रित्या तपास करीत असताना.

वणी पोलिस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्याची मोटरसायकल क्रमांक एम.एच.३४ बि.यु.०३४३ ही चंद्रपूर जिल्ह्यातील जिजामाता नगर नांदा फाटा कोरपना येथिल सराईत चोरटा नितीन उर्फ बिट्टु नथ्थुजी मारबते,२४ वर्ष याने चोरली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ठाणेदार अजीज जाधव यांनी पथक तयार करून आरोपी पकण्यासाठी वणी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी सदर आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचेकडून सदर प्रकरणात चोरीस गेलेली तसेच वणी परिसरात विविध ठिकाणावरून चोरीस गेलेल्या काळ्या रंगाची होंन्डा कंपणीची ॲक्टिवा,क्र.एम.एच.३४ बि.यु.०३४३ किंमत ३०,०००/, काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर विना क्रमांकाची,किंमत २०,०००,टाळल्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर,विना क्रमांकाची,२०,०००, लाल व चंदेरी हिरो,आयस्मार्ट  मोटरसायकल,एम.एच.२९ ए.पी.४७८३ किंमत ३०,०००  एकुण ४ मोटारसायकल १,००,००० एक लाख रुपये, जप्त करण्यात आल्या.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे, पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोलिस निरीक्षक अजित जाधव,यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी, तसेच पो.हे.कॉ.विकास धडसे,ना.पो.का.सुधिर पांडे,शुभम सोनूले, सुनील नलगंटीवार, सागर सिडाम, यांनी पार पाडली.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...