Home / यवतमाळ-जिल्हा / शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण...

यवतमाळ-जिल्हा

शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण करणे आणि सरकारी शाळांचे व्यापारीकरण करणे हा अन्यायकारक निर्णय मागे घ्या

शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण 	करणे आणि सरकारी शाळांचे व्यापारीकरण  करणे हा  अन्यायकारक निर्णय मागे घ्या
ads images

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि सामाजिक संघटना, वणी यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

वणी:महाराष्ट्र सरकारने नुकताच  सरकारी नोकरींची भरती नऊ वेगवेगळ्या खाजगी कंपन्याकडून (बाह्ययंत्रणेमार्फत) करण्याची घोषणा केली  तसेच अशा शासकीय नौकऱ्यांचे कंत्राटिकरन केले असून सदर कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ही भरती होईल असा निर्णय घेतला.ही अन्यायकारक बाब आहे.राज्यातील ग्रामीण, शहरी, निमशहरी भागातील विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात,त्यांना शासकीय सेवेत कायम करणे आवश्यक असताना खाजगी कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने भरती केल्यामुळे तरुणांचे भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे हा आत्मघातकी निर्णय त्वरित मागे घ्यावा.

तसेच, सरकारी शाळा खाजगी क्षेत्राला दत्तक देऊन शाळांचे व्यापारीकरण करण्याबाबत जो शासन निर्णय आपण निर्गमित केला आहे. ती गरीब वंचित मुलांसाठी शिक्षणबंदी ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा शिक्षक पदभरती करावी,अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करावी आणि शिक्षण हक्क अधिनियम २००९ ची काटेकोर अंमलबजावणी करावी, जेणेकरून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्याचबरोबर समूह शाळा या गोंडस नावाखाली राज्यातील १४००० हजार शाळा बंद करणे म्हणजे शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांनी घडवलेल्या महाराष्ट्राला कलंकित करणारी बाब आहे. तरी सदर अन्यायकारक निर्णय तत्काळ रद्द करून महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन वणी येथे शांततेत पार पडलं.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...