वणी:- ६७ व्या धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त नगराळे मॅटर्निटी हॉस्पिटल्स व जयभीम माॅर्निंग गृपच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन पटावर आधारीत " गीत भिमाच्या ऋणाचे" या गीत गायनाचा कार्यक्रम २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सम्राट अशोक नगर, बुद्ध विहार वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला श्रोत्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक डॉ.संचीता नगराळे,विजय नगराळे, गजानन रामटेके,चंद्रसेन जिवने,प्रदिप खैरे, विवेक तेलंग, वसंत नगराळे,
प्रा.भाऊराव लोणारे,तातोबा बहादे,नरेश तेलंग, रामदास टिपले,बिरबल पाटील, जयदेव पाटील,श्रीरंग पुसाटे, अशोक निमसरकर यांनी केले.