Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

38.1

Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / आता तर फक्त कुलूप ठोकलं...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

आता तर फक्त कुलूप ठोकलं यापुढे मनसे स्टाईल आंदोलन करणार - राजु उंबरकर

आता तर फक्त कुलूप ठोकलं यापुढे मनसे स्टाईल आंदोलन करणार - राजु उंबरकर
ads images

मारेगाव तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने मनसे आक्रमक

मारेगाव: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी १ रुपया मध्ये पंतप्रधान पिक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. पुर परिस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मतदारसंघांतील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र या नुकसानाची विमा कंपन्यांकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामेच झालेले नाही. यामुळें शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही.  याच मुद्द्याला घेतं उंबरकरानी आक्रमक पावित्रा घेतं या कार्यालयाला कुलूप ठोकून हा पीक विमा लवकरात लवकर द्यावा अन्यथा यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा सज्जड दम उंबरकर यांनी कंपनीला दिला.

मनसे नेते राजु उंबरकर आज मतदारसंघाचा दौरा करत असताना तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने असणारी पिक विम्याची समस्या जाणून घेतली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी संबंधित कंपनीकडून पंचनामेच झालेले नाही.  तर जिल्ह्यात काहींच्या खात्यावर १० रुपये अशी शुल्लक रक्कम तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ही रुपया जमा झालेला नाही. अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली या विषयाची तात्काळ दखल घेत उंबरकरानी शेतकऱ्यांसह मारेगाव येथील रिलायन्स पीक विमा कंपनीचे कार्यालयं गाठले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी पदवीधर किंवा याक्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी या कंपनीकडून पदवीधर व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले युवक नियुक्त केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानीचे गांभीर्य या प्रतिनिधींना नसल्याचे सामोरं आले. त्यामुळे कंपनीकडून योग्य ते पंचनामा आणि तसा अहवाल कंपनीकडे सादर झाला नाहीं. परिणामी काही शेतकऱ्यांना १० रुपये १०० रुपये अशी तोकडी मदत मिळाली तर सर्वाधिक शेतकऱ्यांना ही मदतच मिळाली नाही. त्यामुळे हा विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी राजु उंबरकर यांनी आक्रमक पावित्रा घेत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल. तर स्थानिक कार्यालयालातून शेतकऱ्यांना कोणताही फायदा नसल्यानें या कार्यालयाला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. तर लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर यापुढें उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा सज्जड दम या अधिकाऱ्यांना देण्यात आला. 
यावेळी मनसेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, वसंता घोटेकार, उदय खिरटकर,शेख नबी, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, संतोष राठोड, लक्की सोमकुंवर,मयूर घाटोळे, सुरज काकडे, धिरज बगवा यांच्या सह मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

  • या कार्यालयात भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर कोणतीही कार्यवाही करता येत नसून उच्चस्तरावरूनच यात बदल करता येतील असे सांगितले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवरून चर्चा झाली. मग प्रश्न पडतो की, शासनाने तालुकास्तरावर अशी पिक विमा कार्यालय उघडून नक्की कोणता पराक्रम केला ? आणि कशासाठी उघडली आहेत. त्यामुळे आज शेतकऱ्याचा समक्ष  स्वतः या कार्यालयाला टाळे ठोकले. आता फक्त कुलूप ठोकलं यापुढे मनसे स्टाईल आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार.

       - राजु उंबरकर
         नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

ads images

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

मारेगावतील बातम्या

कानडा येथे महिलांनी पकडली दारू

मारेगाव: तालुक्यातील कानडा (पार्डी) येथील महिलांनी काल दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवार ला कानडा येथील शेतातुन दारू पकडून...

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी

यवतमाळ,दि.२४ : परदेशात विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व शेतकऱ्यांनी केलेला अवलंब आणि उत्पन्नात झालेली वाढ याचा...

यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार मैत्री प्रशिक्षण

यवतमाळ, दि. २४ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २०० सुशिक्षित बेरोजगारांना...