Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *वणी येथे मतदार जनजागृती...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*वणी येथे मतदार जनजागृती साठी सायकल रॅली*

*वणी येथे मतदार जनजागृती साठी सायकल रॅली*

*वणी येथे मतदार जनजागृती साठी सायकल रॅली*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:- चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाचे सार्वत्रिक निवडणूक दि. 19 एप्रिलला होत आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी वणी येथील शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे व तहसीलदार निखिल धुळधर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करून दिली.मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात होण्यापूर्वी रॅलीचा उद्देश सांगण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नितीनकुमार हिंगोले,  गणेश किंद्रे, निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, नायब तहसीलदार विवेक पांडे, रोटरीचे निकेत गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व तहसीलदार निखिल धुळधर यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित करून या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रत्येकांनी वैयक्तिक रित्या परिश्रम घेणे ही आजची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी मतदान केलच पाहिजे यासाठी ही जनजागृती रॅली काढत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी केले.त्यानंतर वणी शहरातील सर्व माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयातील सायकल धारी विद्यार्थ्यांची रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरून पुन्हा येथील शासकीय मैदानावर विसर्जित झाली.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

वणीतील बातम्या