Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / चंद्रपूर-वणी-आर्णी-लोकसभा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

चंद्रपूर-वणी-आर्णी-लोकसभा निवडणूक तिरंगी लढत होण्याचे संकेत.

चंद्रपूर-वणी-आर्णी-लोकसभा निवडणूक तिरंगी लढत होण्याचे संकेत.

वणी:- थेट आरोपांची खैरात एकमेकांवर डागणे हे नित्याचेच झाले."ह्याची त्याने जिरवली,त्याची हो जिरवतील".ह्याच राजकारण त्याच्याही अलंगट येणार.पक्षाचे काही देणे घेणे नाही,पण काही असो तो माणूस खूप चांगला,ह्या भाबड्या पोलखोल गोष्टी निवडणूकी दरम्यान चर्चेचा विषय काही नवीन नाही.आता होत असलेल्या लोकसभेत कोण बाजी मारेल? पुन्हा चर्चा चंद्रपूर-वणी -आर्णी मतदार संघात रंगत आहे.सध्या सोशल मिडियावर काही मंडळी व कार्यकर्ते आपल्या उमेदवारांबाबत कामांचा विकासाचा प्रचार शेअर करताना दिसत आहे. मात्र,गुढीपाडव्यापासून ख-या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.प्रचारात कोण आघाडी घेईल हे आज जरी सांगता येत नसले तरी सध्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या मतदार संघातील गावोगांवी मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे.

परंतु गुढीपाडव्यापासून प्रचाराला वेग येईल.चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर,भाजपचे सुधीर मुनगंटीवार व वंचितचे राजेश बेले निवडणूक रिंगणात उतरले असून या शिवाय काही अन्य उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब आजमावून पाहत आहेत,तेही प्रचारात ताकदीने उतरले.प्रत्येक उमेदवारांना आपल्या विजयाची आशा लागली जरी असली तरी महाविकास आघाडी,महायुती व वंचित च्या उमेदवारात अतितटीची लढत होईल असे काही राजकीय मंडळींचे म्हणणे आहे.त्यामुळे चंद्रपूर लोकसभा तिरंगी लढत किंबहुना चांगलीच चुरशीची होणार आहे.आ.प्रतिभा धानोरकर यांना भावनिकतेचा फायदा होईल,असे काही राजकीय वर्तुळातून वर्तविले जात आहे.तर दुसरीकडे मंत्र्याचा विकास प्रचारात काही कमी नाहीत.तेही विजय मिळवूच अशी मोट बांधत आहे.परंतु ताई की भाऊ? किंवा आणखी कोणी तिसरा नवीन चेहरा उदयास येइल? याचा संभ्रम आहे.कारण मागील लोकसभा निवडणुकीत पाहता कोण कोणाला धक्का दिला' ही धाकधूक उमेदवारीवरून सुरुवातीला चर्चेत होती.परंतु याबाबत कोणीच रोखठोक मन की बात करित नसले तरी "आमचं ठरलं" म्हणून आभासी दुनियेचा आधार घेत प्रचार कार्य तूर्तास जोमात सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.आपआपल्या उमेदवारासाठी मतदारांना साकडे घातले जात असून त्यांच्या विजयाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातील मतदारांनी कंबर कसली आहे.शहरात प्रचार गरम आहे,तर ग्रामीण भागात प्रचार थंडा दिसून येतो.मात्र,सध्या सोशल मीडियातून तुफान फटकेबाजी कहर करत आहे.परिणामी जस जसे दिवस जवळ येत आहे,तस तसे होत असलेल्या तिरंगी लढतीची धडकी राजकीय नेत्यात वाढत असून मतदारात ही निवडणुक उत्सवासारखी आहे,एवढे मात्र निश्र्चित.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

वणीतील बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...