Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / या देशाचा पंतप्रधान...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

या देशाचा पंतप्रधान हप्ता बाहादूर आहे:- ॲड.प्रकाश आंबेडकर.

या देशाचा पंतप्रधान हप्ता बाहादूर आहे:- ॲड.प्रकाश आंबेडकर.

इलेक्ट्रॉरल बाँड म्हणजे जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपचा घेतला खरपूस समाचार

वणी :- मागील १४ वर्षात देशाच वाटोळं झाल असून देशाला बरबाद करणारा हा असा निर्बुद्ध पंतप्रधान तुम्हाला कधी पासून आवडायला लागला आहे. असा थेट सवाल सनातन हिंदू धर्माच्या लोकांना वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज वणी येथील शासकीय मैदावरिल आयोजित  लोकसभा उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सभेत विचारला. 

चंद्रपूर -आर्णी - वणी लोकसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे वणीत आले होते. ते पुढे सभेला संबोधित करताना अस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी  इलेक्ट्रॉरॉल बाँड म्हंजे एक प्रकारे हप्ते वसुलीचे काम केले आहे. ज्या प्रमाणे गल्लीतील दादा जे करतो तेच काम मोदींनी केले आहे. इलेक्ट्रॉरॉल बाँड देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे नाव कमी करून सर्वत्र मोदी मोदी करण्यापलीकडे देशात काहीच केले नाही.  छप्पन इंची छाती सांगणारे आता १४ इंचावर आले आहे. एकीकडे चायना देशात घुसखोरी करून छाताडावर बसला आहे तर दुसरीकडे पाकिस्तान दररोज आपल्या जवानांची हत्या करीत आहे.  यांना सत्तेच्या बाहेर हाकलले पाहिजे. तरच देशातील लोकशाही वाचू शकते अन्यथा कधी हुकूमशाही लागेल कळणार नाही. एखादा उमेदवार उभा असला तर त्याला भाजपा ऐवजी मोदींचा म्हटल्या जाते, सरकार कोणाच तर मोदीच, उमेदवार कोणाचा तर मोदींचा तर मग भाजप कुठ गेलं भाजप आणि आरएसएस पुर्णतः खतम करण्याचे काम स्वतः मोदी करीत आहे. तरी सनातन हिंदू ना कळल नाही. आणि असा निर्बुद्ध पंतप्रधान तुम्हाला चालतो का असा सवाल उपस्थित केला आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन सभे करिता वंचितचे प्रदेश कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ प्रदेश महासचिव बालमुकुंद घिरड, विदर्भ संयोजक रमेश गजभिये,   युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष डॉ . निरज वाघमारे, महासचिव मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर,  मोहन भवरे, रवी भगत, धम्मवती वासनिक, पुष्पा शिरसाट, संघपाल कांबळे, गौतम दारुंडे, प्रतीक मुनेश्वर, राजेश तलवारे, वैशाली गायकवाड, शरदा मेश्राम, अर्चना कांबळे, अर्चना नगराळे, प्रणिता कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

वणीतील बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...