Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सुधीरभाऊ विकासाची दृष्टी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सुधीरभाऊ विकासाची दृष्टी असणारा नेता.

सुधीरभाऊ विकासाची दृष्टी असणारा नेता.

वणी:-  मागील दहा वर्षात पंतप्रधान मोदीजींनी देशात विकासाचा झंझावात सुरू केला. एनडीए कडे नरेंन्द्र मोदी यांच्या रुपात एक शक्तिशाली इंजिन आहे. त्याला सुधीरभाऊ सारखे डब्बे जोडल्या गेले आहेत. विरोधकाकडे सर्वच घटक पक्षाचे नेते हे इंजिन आहे. मग या देशाची गाडी कशी चालेल. देशाच्या  विकासाची  गाडी भरधाव वेगाने धावावी असे तुम्हाला वाटत असेल तर मोदीजी सारख्या शक्तिशाली इंजिन सोबत सुधीरभाऊ मुनगंटीवार सारखे विकासाची दृष्टी असणारे डब्बे असतील तर विकासाची गाडी भरधाव धावणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सक्षम उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ वणी येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

व्यासपीठावर  प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, आमदार डॉ. संदीप धुर्वे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजुभाऊ उंबरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे विनोद मोहितकर, भाजपाचे रवी बेलूरकर, अलका आत्राम, विजय चोरडिया,विजय पिदूरकर, जीवन पाटील, श्रीकांत पोटदुखे, नितीन वासेकर, डॉ. मंगेश गुलवाडे, गजानन विधाते, सतीश नाकले इत्यादी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

  हजारो नागरिकांच्या उपस्थितीत येथील शासकीय मैदानावर दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलतांना पुढे म्हणाले की, मागील 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणले. 20 कोटी लोकांना घरे उपलब्ध करून दिली. 11 कोटी लोकांना घरी स्वच्छता गृह निर्माण करून दिली. बचत गटांना 8 लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिली. मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोट्यवधी लोकांना स्वतः च्या पायावर उभे केले. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण केले. सुधीरभाऊंना मत म्हणजे नरेंद्रजी मोदीना मत आहे. त्यामुळे सुधीरभाऊ सारखा विकासाची दृष्टी असणारा लोकप्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज आहे.

  याप्रसंगी चित्रा वाघ बोलतांना महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यावर व या मतदार संघातील उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका करीत कांग्रेसमुळे  हा देश रसातळाला गेला आहे. याची प्रचिती मागील चार वर्षात आली. मागील चार वर्षात धानोरकर यांचा व नातेवाईकांचा विकास झाला की, या लोकसभा क्षेत्राचा विकास झाला याचा विचार प्रत्येक मतदाराने करूनच मतदान करावे असे आवाहन केले.

 मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी देशाच्या व या भागाचा विकासासाठी कोणतीही जात- पात न पाहता उमेदवाराचे कर्तृत्व पाहून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. या विधानसभेचे आमदार बोदकुरवार बोलतांना ही देशाची निवडणूक आहे. प्रधानमंत्र्याचे हात बळकट करण्यासाठी सुधीरभाऊंना निवडून देण्याचे आवाहन केले.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

वणीतील बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...