Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *महिलांवरील अन्याय...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*महिलांवरील अन्याय खपवून घेणार नाही :- गजानन पाटील जुमनाके* *जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*

*महिलांवरील अन्याय खपवून घेणार नाही :- गजानन पाटील जुमनाके*     *जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*

*महिलांवरील अन्याय खपवून घेणार नाही - गजानन पाटील जुमनाके*

 

 *जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती :- तालुक्यातील आंबेझरी येथे एका अल्पवयीन आदिवासी कोलाम समाजाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे आणि मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढल्याची घटना देशभर गाजत आहे. या दोन्हीही घटनेच्या निषेधार्थ गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने शेकोडो समाज बांधवांच्या उपस्थितीत जिवती तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

महिलांवर सातत्याने देशभरात अन्याय अत्याचार व बलात्काराचे प्रकरण समोर येत आहे, महिलांची आदर करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला मूठ माती देऊन देशभरात महिलांवरील बलात्काराचे प्रकरण हे निंदनीय आहे तरीसुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आरोपींची  कसलीही चौकशी न करता फासावर चढवण्यात यावे, त्याशिवाय देशभरातील महिलांवर अत्याचार कमी होणार नाही. मणिपूर राज्यातील आणि जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील प्रकरण अतिशय निंदनीय आहे, माणुसकीला काळिमा फसणाऱ्या दोन्ही घटना आहे, त्याचा सरकारने आणि प्रशासनाने तातडीने निकाल लावावा, महिलांवर होत असलेले अत्याचार आम्ही कदापि खपवून घेणार नाही अन्यथा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभे करू असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके यांनी दिला.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह मडावी, माजी सभापती भीमराव मेश्राम, माजी उपसभापती महेश देवकते, राज गोंडवाना गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकांबळे, नगरसेवक ममताजी जाधव, क्रिष्णा सिडाम यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

या मोर्चाचे यशस्वी आयोजन मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्य सल्लागार लिंगोराव सोयाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष कंटू कोटनाके, भारी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके, पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, युवानेते मंगेश पंधरे यांच्या सह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...