Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *उपजिल्हा रुग्णालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम संपन्न*

*उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम संपन्न*

*उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 वरोरा:- दिनांक १९ आॅक्टोबर २०२३ ला जागतिक रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.हा कार्यक्रम महिनाभर वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांतून घेता येतो.नवरात्रीचे दिवस चालू आहे.नवरात्र हे शक्तीचे प्रतीक आहे.त्याच शक्तीचा आदर्श घेऊन नवरात्रोत्सवचे औचित्य साधून हा रजोनिवृत्ती दिनाचा कार्यक्रम खास महिलांसाठी जनजागृतीपर प्रचार व प्रसार करण्याचे उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वंदना विनोद बरडे सह.अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी आयोजित केला होता.या कार्यक्रमाला डॉ सुषमा लांबट स्त्रीरोग तज्ज्ञ,सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका,,सौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ, सौ डॉ वर्षा भुसे फिजिओथेरपिस्ट,सौ नेहा ईंदुरकर समुपदेशक उपस्थित होत्या या सर्व तज्ञ महिलांनी आपआपल्या क्षेत्रातील विषयांवर मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम स्त्रियांनी स्त्रियांसाठी आयोजित केला होता.रजोनिवृत्ती दिनाचा संदर्भात मार्गदर्शन करुन प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले होते..डाॅ लांबट स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी रजोनिवृत्तीचि माहिती, लक्षणें, उपाय, विषयी मार्गदर्शन केले.सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी रजोनिवृत्ती मध्ये कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग आणि सासू सुनेतील संबंध यांचे महत्त्व समजावून सांगितले त्याचा परिणाम चांगला कसा होतो आणि जीवन कस खूशयाली सुखदायी होतों याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेसौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले.कोण कोणता आहार घ्यायला पाहिजे.काय खबरदारी घ्यायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले. डॉ वर्षा भुसे फिजिओथेरपिस्ट यांनी रजोनिवृत्ती मध्ये कोणकोण व्यायाम, प्राणायाम करायला पाहिजे.याविषयी सविस्तर माहिती दिली.सौ नेहा ईंदुरकर समुपदेशक यांनी रजोनिवृत्ती मध्ये आपले मानसिक स्वास्थ्य कसे ठेवायचे  याचे मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन स्नेहा रामटेके यांनी केले प्रास्ताविक  स्वाती जूणारकर व आभारप्रदर्शन सौ सोनाली राईसपायले यांनी केले या कार्यक्रमाला श्रीमती सरस्वति कापटे परिसेविका,कु.जोशीला गेडाम यांनी सहकार्य केले.स्री शक्तीला सलाम करूंन तिसर्या ईनींगचे स्वागत करून पाॅझीटीव्ह विचार शैली आत्मसात करून पुढील आरोग्यदायी जीवनाची सकारात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...