Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत टेमूर्डा येथे शेतकरी उत्पादक कंपनी गोदाम बांधकाम भुमीपूजन संपन्न*

*स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत टेमूर्डा येथे शेतकरी उत्पादक कंपनी गोदाम बांधकाम भुमीपूजन संपन्न*

*स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत टेमूर्डा येथे शेतकरी उत्पादक कंपनी गोदाम बांधकाम भुमीपूजन संपन्न*  

             

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

  वरोरा:-महाराष्ट्र शासनाच्या जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्पा अंतर्गत मा, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत वरोरा तालुक्यातील  टेमुर्डा येथील कृषकोन्नती कृषी विकास आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी टेमुर्डा यांना प्रकल्प उभारणीसाठी  गोदाम बांधकामाचे व प्रतवारी शेडचे भुमीपूजन चन्द्रपूर नागपूर मार्गावरील टेमुर्डा येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आबीद अली संचालक वैनगंगा व्हॅली महासंघ चन्द्रपूर यांनी फित कापून पुजन केले यावेळी नोडल अधिकारी ( स्मार्ट) नंदकुमार घोडमारे यांनी कुदळ मारून भुमीपूजन केले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक बंडु डाखरे अध्यक्ष कृषकोन्नती कृषीविकास आदीवासी शेतकरी उत्पादक कंपनी यांनी प्रकल्पाची उभारणी व कंपनीचे कार्याची विस्तृत माहीती दिली .आबिद अली यांनी शेतकरी उत्पादक कंपनी शेतकर्‍याची चळवळ म्हणून पुढे येत आहे. केन्द्र शासन व  राज्यशासन राबवित असलेले उपक्रम हे शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये व शेतकऱ्यांच्य उत्पादना बरोबर प्रक्रीया उद्योगातून आर्थिक बळ मिळावे व्यापारी वर्गापासून बळीराजाची पिळवणुक थांबवून बाजार भावाचे चढ उतार ,  साठवणूकीची समस्या सुटावी व  शेतकर्‍याना उत्पादनात वाढ ,  शेतमाल प्रक्रीया व  रोजगार निर्मीती करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या पुढे आल्या आहेत. सभासदानी व परिसरातील शेतकरी बांधवांनी या मध्ये सक्रीय सहभाग घेऊन लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध झाल्याने नवनविन तंत्रज्ञान , उत्तम दर्जाचे बि-बियाणे वापर करून पिकपद्धतीत बदल करुन गरजे नुसार  पिक फेरपालट करावे . शासकीय योजनाचे माध्यमातून वखार पावतीवर तारण सारख्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त केले. नंदकुमार घोडमारे नोडल अधिकारी स्मार्ट यांनी जिल्हयात २५ प्रकल्प प्रस्ताव तयार आहेत व  १५ प्रकल्पाना प्राथमिक मान्यता मिळाल्याची माहिती दिली.जिल्ह्यात ४ कामाची सुरूवात झाली असून नोव्हेबर अखेर १० कामे सुरु करता येईल असे सांगितले .मा . विनय गौडा जिल्हाधिकारी चंद्रपूर व मा .प्रिती हिरळकर प्रकल्प संचालक (आत्मा) हे सतत पाठपुरावा करीत असून बॅक प्रशासन देखील सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने  जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या कामाना गती मिळालीआहे .असे मत व्यक्त केले .यावेळी  मुकेश जिवतोडे जिल्हा प्रमुख शिवसेना (उबाठा) चंद्रपूर , वरोरा तालुका उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लव्हाटे   विभागीय स्मार्ट टिम चे कार्यकारी अभियंता हेमंत जोशी , कैलास संसारे , संपादन अधिकारी, सत्यपाल ठाकरे विभागीय मुल्य साखळी तज्ञ, प्रगती चव्हाण म.कृ.अ टेमुर्डा,  प्रतिक भेंडे  संतोष खडतर , व्हि डी घागी  मुंढे यांचे सह कंत्राटदार सजई इन्फ्रा स्टील चे स्वप्नील आठवले , सोनटक्के ,       बालाजी धोबे (CEO)वैनगंगा व्हॅली ,विलास माटे CEO ,  संचालक व सदस्य कृषकोन्नती कृषीविकास आदीवासी शेतकरी उत्पादक कंपनी उपस्थीत होते

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...