Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *शेतकऱ्यांच्या निवेदनाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*शेतकऱ्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल, नागरी भागातील शेतकऱ्यांना मिळाली दिवसाला वीज* *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे : रविंद्र शिंदे* *अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकजुटीचा विजय*

*शेतकऱ्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल, नागरी भागातील शेतकऱ्यांना मिळाली दिवसाला वीज*    *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे : रविंद्र शिंदे*    *अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकजुटीचा विजय*

*शेतकऱ्यांच्या निवेदनाची तात्काळ दखल, नागरी भागातील शेतकऱ्यांना मिळाली दिवसाला वीज*

 

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे : रविंद्र शिंदे*

 

*अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकजुटीचा विजय*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा : तालुक्यातील नागरी भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेवून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना लढवैय्या शिवसैनिक अभिजित कुडे यांनी दोन दिवसाआधी दिलेल्या निवेदनाची दखल घेत महावितरण नागरी विभागातर्फे शेतकऱ्याकरीता दिवसा वीज पुरवठा सुरु करण्यात आला.नागरी भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या असून यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा, नागरी भागात 18 ट्रान्सफार्मर, विजपुरवठा बंद झाल्यास लवकर सुरु करणे, जीर्ण झालेलेपोल बदलविणे, वीज देयकाच्या तक्रारी सोडविणे या समस्याबाबत विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात युवासेना सैनिक अभिजित कुडे यांच्या नेतृत्वात समस्याग्रस्त शेतकरी यांना घेवून नागरी विभागातील महावितरण अभियंता वावरे यांना दोन दिवसाआधी निवेदन देण्यात आले होते. 7 दिवसात मान्य न केल्यास व समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा अभिजित कुडे यांनी महावितरण अभियंत्याना निवेदनाव्दारे दिला होता. उपविभागीय अभियंता यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली होती.शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा ही प्रमुख मागणी होती. महावितरण नागरी विभाग अभियंता यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ दोन विभागात आळीपाळीने एका विभागाकरीता सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या विभागात दुपारी 1 ते सायंकाळी 8 पर्यंत अशा पध्दतीने वीज पुरवठा आजपासून दिवसाला सुरु करण्यात आला. निवेदनातील इतर मागण्या पण लवकरात लवकर पुर्ण करु असे आश्वासन महावितरण नागरी विभाग अभियंता वावरे यांनी अभिजित कुडे सह इतर शेतकऱ्यांना दिले आहे.जीव मुठीत धरून शेतकर्ऱ्याना रात्रीला थंडीचा, जंगली प्राणी यांचा सामना करत ओलीत करा लागते. वीज पुरवठा खंडित होत असतो, ट्रान्सफरमर महिना होऊन देखील मिळत नाही या साठी अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वात शेतकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली. आधीच शेतकरी संकटात असून त्याला दिवसा वीज मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमण झाली आहे.दिवसा विज पुरवठा सुरु झाल्यामुळे नागरी विभागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास शेतकऱ्यांना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी दिला. याप्रसंगी वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर उपस्थित होते. हा विजय शेतकरी यांच्या एकजुटीचा विजय आहे असे अभिजीत कुडे यांनी व्यक्त केले.महावितरण नागरी विभाग अभियंता वावरे यांना निवेदन देता प्रसंगी यावेळी अभिजित कुडे, ओंकेश्वर टोंगें, राजेंद्र झापर्ड ,सचिन पिसे, रोशन भोयर, विनोद कोठारे, मयूर राडे, विक्की महाकुलकर, बाळू गावंडे, सुरेंद्र ठाकरे, नरेंद्र ठाकरे, आशिष महल्ले ,संजय गावंडे, रविन्द्र पावडे,  गजानन चिंचोलकर, सुनील पोहकर,राहुल कुडे, रंजीत कुडे, विनोद उरकुडे, नितीन धोटे, गणेश शेंडे, हरिभाऊ डफ,दादाजी मत्ते, अभिमान शेळके, शेषराव तूराडे, शंकर चामटे,  सुजित लोंढे,  वैभव पुसदेकर  व असंख्य शेतकरी उपस्थित होते.दिवसा विजपुरवठा सुरु झाल्यामुळे नागरी विभागातील शेतकरी यांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, युवा सैनिक अभिजित कुडे यांच्यासह शिवसेनेचे आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...