Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *सरपंचा विरोधात अविश्वास...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मांडला* *तसीलदारांनी सरपंचाला केले अपात्र घोषित* *सभेतून बाहेर निघाल्यानंतर उपसरपंचानी केली अपात्र सरपंचाला शिवीगाळ व मारपीट* *वरोरा पोलिसात तक्रार*

*सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मांडला*    *तसीलदारांनी सरपंचाला केले अपात्र घोषित*    *सभेतून बाहेर निघाल्यानंतर उपसरपंचानी केली अपात्र सरपंचाला शिवीगाळ व मारपीट*    *वरोरा पोलिसात तक्रार*

*सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मांडला*

 

*तसीलदारांनी सरपंचाला केले अपात्र घोषित*

 

*सभेतून बाहेर निघाल्यानंतर उपसरपंचानी केली अपात्र सरपंचाला शिवीगाळ व मारपीट*

 

*वरोरा पोलिसात तक्रार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा:-गट ग्रामपंचायत फत्तापूर ही सात सदस्यीय असून या ग्रामपंचायतीत रामपूर व पिंपळगाव ही गावे अंतर्भूत आहे.2 जानेवारी 2024 ला सकाळी 11 वाजता दरम्यान विद्यमान सरपंचा अर्चना संजय कुमरे यांच्यावर सर्व ग्रा.प.सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला.अविश्वास ठराव कार्यवाही ही तहसीलदारांचे उपस्थित पार पडली. सरपंचाच्या विरोधात सहा विरुद्ध एक असे सदस्य संख्या असल्याने ठराव संमत झाला त्यामुळे तहसीलदारांनी विद्यमान सरपंचा यांना अपात्र घोषित केले. आणि कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार ग्रा.प.च्या कार्यालयाबाहेर पडले.त्याचवेळी सरपंचा सुद्धा तहसीलदारांचा आदेश मान्य करीत बाहेर पडल्या. तहसीलदारांनी सांगितले की अपील करता येतो.असे सांगून तहसीलदार निघून गेले. सरपंचा सार्वजनिक ठिकाणी असतांना उपसरपंच विलास वायदुडे आले सरपंच महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत हाता बुक्क्यांनी मारहाण केली.त्यामुळे सरपंच महिलेच्या हाताला मर लागला आहे .असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.मारहाण होतांना सरपंचा महिलेचा पती संजय कुमरे व गावातील नंदू जोगी आणि अभिमान जोगी यांनी मध्यस्थी करीत वाद सोडविला.उपसरपंच विलास वायदुडे यांचे पासून माझ्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.पोलीस निरीक्षक काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरोरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

देशी दारू भट्टी सुरू करण्यासाठी द्यायचे आहे नाहरकत प्रमाणपत्र गावात देशी दारू भट्टी सुरू करण्याकरिता ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे त्यासाठी मी अडसर ठरली होती.  म्हणून उपसरपंचासह पाच असे एकूण सहा सदस्यांनी अविश्वास आणून मला पायउतार करायचे असे नियोजन केले होते.चिरीमिरी घेऊन देशी दारू भट्टी धारकाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा डाव असल्याने माझ्यावर  अविश्वास आणण्यात आला.

*अर्चना संजय कुमरे*

माजी सरपंचा फत्तापूर ग्रा.प.

ताज्या बातम्या

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...