Home / क्राईम / घर भाड्याचे पैसे मागने...

क्राईम

घर भाड्याचे पैसे मागने महागात पडले भाडेकरूंनी केले घर मालकालस मारहाण

घर भाड्याचे पैसे मागने महागात पडले भाडेकरूंनी केले घर मालकालस मारहाण

घर भाड्याचे पैसे मागने महागात पडले भाडेकरूंनी केले घर मालकालस मारहाण

वणी: घर भाड्याचे पैसे मागणाऱ्या घरमालकाशीच भाडेकरूंनी वाद घालत त्याला मारहाण केल्याची घटना काल रात्री १२.३० ते १ वाजताच्या सुमारास शहरातील तेलीफैल येथे घडली. भाड्याने राहणारे दोघे व इतर एक जण अशा तिघांनी मिळून वडिलांना लाथा बुक्यांनी मार केल्याने त्यांना जबर दुखापत झाल्याची तक्रार मुलाने पोलिस स्टेशनला केली आहे. मुलाच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या इसमाला आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर नंतर डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले. 

याबाबत उदय संतोष कारिंगवार (१९) रा. रंगनाथ नगर याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार त्याचे तेलीफैल येथे वडिलपार्जित घर असून ते मागील तीन चार दिवसांपासून तेलीफैल येथील घरी एका वेगळ्या खोलीत रहात होते. बाकी सर्व परिवार हा रंगनाथ नगर येथे राहतो. तेलीफैल येथील घरात चार भाडेकरू आहेत. या घरात राहणाऱ्या एका महिला भाडेकरूने रात्री १२.३० वाजता उदय याला फोन करून त्याचे वडील संतोष भैय्याजी कारिंगवार (४७) याच्याशी त्याचेच भाडेकरू असलेले दोघे व अन्य एका जनाने वाद करीत जबर मारहाण केली. उदय तत्काळ तेलीफैल येथील घरी आला असता त्याला वडील जख्मी अवस्थेत पडून दिसले. वडिलांना घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता वडिलाने भाडेकरू असलेल्या प्रदीप तुफाने केवट (३७) रा. तेलीफैल, शेख रहीम शेख मुखत्यार (३१) रा. तेलीफैल व भीम नगर येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने त्याला काठीने व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनी घर भाड्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून मारहाण  केल्याचे वडिलांनी सांगितले.

वडिलांच्या डोक्याला रक्त लागले होते. तर उजव्या गालाला जखम झाल्याचे दिसून आले. त्याला प्रथम ग्रामीण रुग्णालयात तर नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पोलिसांनी तिनही  आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास जमादार विठ्ठल बुर्रेवार करीत आहे.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...