Home / क्राईम / अमरावतीत पन्नास जणांना...

क्राईम

अमरावतीत पन्नास जणांना अटक

अमरावतीत पन्नास जणांना अटक

अमरावतीत पन्नास जणांना अटक

अमरावती : त्रिपुरामधील घटनेचा निषेध म्हणून पुकारलेल्या अमरावती ‘बंद’दरम्यान शनिवारी (ता. १४) संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्रीनंतर धरपकड सुरू केल्यानंतर आज सकाळपर्यंत ५० जणांना अटक केली. तर आज सकाळीच शहर व ग्रामीण भागातून काही भाजप नेत्यांना स्थानबद्ध केले. नांदेडमध्येही सुमारे ३५ जणांना ताब्यात घेतले आहे.

स्थानबद्ध केलेल्या भाजप नेत्यांपैकी काहींना शहरात तर काहींना ग्रामीण भागात पोलिसांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. स्थानबद्ध केलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे व भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले. या दोघांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. रविवारी पहाटेपर्यंत शहरातील काही भागांत धरपकड मोहीम सुरूच होती.

शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटांतील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले. अमरावतीत पन्नास जणांना अटकतर खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत दुपारी साडेबारानंतर छत्रपुरी खिडकी परिसरात तीन व्यापारी प्रतिष्ठानांना काही उपद्रवींनी लक्ष्य केले. बंद प्रतिष्ठाने फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज लुटला गेला, असे पोलिसांनी सांगितले. त्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

शहरात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत.नांदेड शहरातही शुक्रवारी (ता. १२) कडकडीत बंद पाळत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसानी सुमारे तीनशे संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. आतपर्यं ३५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दंगलीतील इतर संशयितांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतर्गत दहा पथके स्थापन करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

क्राईमतील बातम्या

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...

डॉक्टरसह स्टाफचे पोलिसांनी नोंदवले बयान गरोदर महिला मृत्यू प्रकरणाचा तपास.!

यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...

कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद ; दोघे पसार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न...