Home / महाराष्ट्र / मराठवाडा / माजी केंद्रीय गृहमंत्री...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या.

 

     उत्तम माने

मो.नंः 8484878818

 

लातूर/चाकुर : - शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची आत्महत्या .गोळी झाडून घेऊन केली आत्महत्या .

चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय 81 हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते..ते शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत .दररोज ते सकाळी फिरायला बाहेर जात असत. त्यानंतर ते स्वताच्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी येत .चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्याची खूप वर्षापासूनची सवय आहे .त्यानंतर बाजूलाच असलेल्या स्वताच्या घरी ते जात असत .शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील अधिकतर व्यक्ती हे लातूर येथील निवासस्थानी कधीतरीच हजर असतात.आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते . नित्याप्रमाने चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे घरात आल्यावर त्यांना चहा घ्या मी आवरून येतो असे सागून ते निघून गेले .काहीवेळाने गोळीचा आवाज झाला . घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉल मध्ये आले . त्यांना तेथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले .घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा ची प्रक्रिया सुरू केली आहे ..

     चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती वाडी पहात होते.त्यांना दोन मुले दोन मुली आहेत.सगळ्याची लग्ने झाली आहेत . ते सद्या एका मुलाबरोबर चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅट मध्ये राहत होते .वयोमान प्रमाणे त्यांना अनेक शारीरिक व्याधी होत्या .ते सततच्या आजारपणाला कंटाळून गेले होते .घरात सून मुलगा आणि नातवंडे असल्यामुळे त्यांनी एकांत जाग म्हणून चाकूरकर यांच्या घरातील हॉल मध्ये आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .

चंद्रशेखर पाटील चाकूरकर  याचे चिरंजीव ॲड लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रशेखर पाटील चाकूरकर  यांची बायपास झालेली होती .अश्यातच अनेक व्याधी जडल्या होत्या सततच्या आजारपणाला ते कलंतळून गेले होते .त्यातून हे कृत्य केले असावे .

  अनेकांना केले होते मेसेज "गूड बाय"

आज सकाळी ते दररोज प्रमाणे घरातून बाहेर पडले त्यानतंर त्यांनी स्वताच्या मोबाईल मधील परिचित असलेल्या अनेकांना टेक्स्ट मेसेज केला गूड बाय  काहीवेळाने व्हॉट्सअँप स्टेटस ही ठेवला तो ही गूड बाय असा .. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...