Home / महाराष्ट्र / कोकण / डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...

महाराष्ट्र    |    कोकण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा देश हितासाठी होता. - ॲड. प्रज्ञेश सोनावणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा देश हितासाठी होता. - ॲड. प्रज्ञेश सोनावणे
भारतीय वार्ता (महाराष्ट्र / चंद्रपूर ) आशा रणखांबे / दि .15, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ऊर्जानगर वसाहत यांच्या विद्यमाने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोह 2023 खुले रंगमंच पटांगण व स्नेहबंध सभागृह ऊर्जा नगर वसाहत महाऔष्णिक विद्युत केंद्र, जिल्हा चंद्रपूर, येथे दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी आकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने, फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि आपली जबाबदारी या विषयावर ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील, विचारवंत, अधिवक्ता ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज सपाटे साहेब कार्यकारी संचालक तथा मुख्य अभियंता, प्रमुख अतिथी शाम राठोड उपमुख्य अभियंता, सुहास जाधव उपमुख्य अभियंता, मिलिंद रामटेके उप-अभियंता, आणि ए.टी.पुनसे उपमुख्य अभियंता इत्यादी प्रमुख मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित काही महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित केले. महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या चार ही महापुरुषांचा विचार मानवतावादी विचार होता. मानवी मूलभूत हक्कांसाठी त्यांचा लढा होता. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा होता. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज आपल्याला सर्व अधिकार तर मिळाले परंतु कर्तव्य दिले असताना आपण मात्र कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहोत. समाजाच्या प्रती, राज्याच्या प्रतीआणि देशाच्या प्रती कर्तव्य पार पाडणे हेच आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. समाजातील तरुण वर्गाची वैचारिक मंथन होणे आवश्यक आहे. काही व्यवस्था महापुरुषांच्या विचाराचे चुकीची माहिती समाज माध्यमातुन व्हायरल करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होत आहे ते गैरसमज दूर करणे आजच्या तरुण वर्गाने जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्याला आयुष्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे हे कोणीही विसरता कामा नये, कारण हक्क अधिकार हे कुठेही मिळत नसतात त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष या महापुरुषांनी केला. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा सर्वोच्च अधिकार दिला आणि तोच आपल्याला विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जायचं आहे. सदरील कार्यक्रमाच्या प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष भैयाजी उईके, सहकार्याध्यक्ष एकता मेश्राम, सचिव दिलीप मोहोळ, कोषाध्यक्ष विनीत रामटेके, विलीन माहुलकर आधी सर्व पदाधिकाऱ्यांनी जयंतीच्या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या 24 February, 2024

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

कोकणतील बातम्या

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....