Home / महाराष्ट्र / खानदेश / *'अंनिसने केली बाभळीच्या...

महाराष्ट्र    |    खानदेश

*'अंनिसने केली बाभळीच्या झाडाची जादूटोण्यातून मुक्ती'*

*'अंनिसने केली बाभळीच्या झाडाची जादूटोण्यातून मुक्ती'*

*'अंनिसने केली बाभळीच्या झाडाची जादूटोण्यातून मुक्ती'*

 

नाशिकरोड: परिसरातील गोरेवाडी येथील दहाचाळीच्या मनपा शाळेच्या जवळ एका बाभळीच्या झाडाला टांगलेल्या बाहुल्यांच्या माध्यमातून जादूटोण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या झाडाला ठोकलेल्या लिंबू, मिरच्या, बाहुल्या आणि काही व्यक्तींचे फोटो यामुळे नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे अशा आशयाची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वरील ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ह्या बाहुल्या अमावस्येच्या दिवसानंतर नागरिकांना जास्त प्रमाणात ठोकलेल्या आढळल्या. तसेच लोकांच्या मनामधील इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील आढळल्या. ज्याचे वाईट करायचं आहे त्या दुश्मनाचा फोटो, त्याचे नाव देखील त्या मजकुरामध्ये आढळले. या ठिकाणी असलेले सर्व जादुटोण्याचे साहित्य उदाहरणार्थ वहीचा कागद, बाहुलीचा प्रकार, ठोकण्यासाठीचा खिळा इत्यादी हे सर्व एकाच ठिकाणाहून वितरित झालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरामध्ये असलेला तांत्रिक, मांत्रिक, भगतच अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धेतून लोकांना भुलवतो आणि त्यांना अशा स्वरूपाचे तोडगे करायला लावतो. या जादूटोण्याच्या प्रकाराच्या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी आणि झाडाला टांगलेल्या बाहुल्या काढून टाकण्यासाठी अंनिसतर्फे नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे रविवार 23 एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यपदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये त्या बाहुल्या काढून टाकल्या आणि स्थानिक लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती दूर केली. समितीतर्फे नागरिकांना आवाहन आहे की ज्या नागरिकांनी अशा स्वरूपाच्या कृत्यांमध्ये अंधश्रद्धेतून सहभाग दिला असेल, त्यांचे  तांत्रिक, मांत्रिक, भगताकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे शोषण झालेले आहे, फसवणूक झालेली असेल त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा नाशिकरोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी. महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा अंमलात असल्याने अशा स्वरूपाची तक्रार दाखल झाल्यानंतर नक्कीच भोंदूबाबावर कायदेशीर कार्यवाही नाशिकरोड पोलिसांच्या मदतीने करता येईल. आजच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांचे नेतृत्वाखाली राज्य पदाधिकारी राजेंद्र फेगडे, नाशिकरोड शाखेचे सचिव विजय खंडेराव, सदस्य राजेश जाधव, राजेश शिंदे, त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल नासिर शेख आणि विश्वास घुले यांनी सहभाग घेतला होता.

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

खानदेशतील बातम्या

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) राष्ट्रपतींना निवेदन...*

*मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई बाबत फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा)...

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या सदस्यपदी निवड*

*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...