*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
भारतीय वार्ता न्यूज
नाशिक:-मागील अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून मणिपूर राज्यात जातीय व धार्मिक जाळपोळ, हिंसा घडत आहेत. ते शांत करण्यासाठी व थांबवण्यासाठी केंद्र सरकार तसेच मणिपूरचे राज्य सरकार यांनी कोणतीही ठोस कृती केल्याचे दिसून आलेले नाही. तेथील हिंसक जमावाने तीन आदिवासी महिलांना पोलिसांच्या ताब्यातून खेचून रस्त्यावर विवस्त्र होण्यास भाग पाडून नग्न धिंड काढल्यावर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. प्रतिकार करण्यासाठी गेलेल्या त्यांचे वडील व भाऊ यांना मारुन टाकले. अशी व्हिडिओ क्लिप नुकतीच सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारला फटकारले आहे. ही घटना मागील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली असल्याचे समजते. दरम्यानच्या काळात मणिपूरमध्ये अशा अनेक घटना घडल्याची कबुली खुद्द मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षेतून सूट देणे, त्यांचे उदात्तीकरण करणे असे प्रकार घडल्याने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना राजकीय, धार्मिक आणि जातीय बळ मिळालेले आहे. त्यामुळेच अत्याचार करणाऱ्या पुरुषी हिंसक प्रवृत्तीला जास्त प्रोत्साहन मिळाले आहे. त्यातूनच हे घृणास्पद आणि माणुसकीला व मानवतेला कलंक असणारे प्रकार घडत आहेत असेही फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) म्हणणे आहे.
महिलांवरील ह्या वाढत्या अत्याचारांना कायमचा पायबंद घालायचा असेल तर मणिपूर तसेच इतर राज्यांमधील महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तातडीने पकडून कोणताही जात, धर्म, राजनैतिक निष्ठा असा भेदभाव न करता त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) वतीने मा. राष्ट्रपती, भारत यांना पाठविण्यासाठी मा. जिल्हाधिकारी नाशिक यांना सादर करण्यात आले.
या निवेदनावर फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे (फिरा) जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, ऑफिस सेक्रेटरी विजय खंडेराव यांच्या सह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी डॉ. ठकसेन गोराणे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, डाॅ. श्यामसुंदर झळके, कोमल वर्दे, अरुण घोडेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनच्या (फिरा) वतीने निवासी जिल्हाधिकारी, नाशिक यांना निवेदन देतांना जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, विजय खंडेराव, डॉ. ठकसेन गोराणे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, डाॅ. श्यामसुंदर झळके, कोमल वर्दे, अरुण घोडेराव
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...
*बिटको महाविद्यालयातील प्रा डॉ सुदेश घोडेराव यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यासमंडळाच्या...
*खून झालेल्या महिलेची बुवाबाजी तसेच जादूटोणाविरोधी कायदा संदर्भाने अधिक चौकशी करून कारवाई करणे बाबत महाराष्ट्र...
*"अल्पवयीन शाळकरी मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे मागणी."* नाशिक : ईयत्ता १० वी च्या शाळकरी...