Home / विदर्भ / वाशिम / *सरकारची शासन आपल्या...

विदर्भ    |    वाशिम

*सरकारची शासन आपल्या दारी योजना फसवी प्रा.डॉ.अशोक जाधव*

*सरकारची शासन आपल्या दारी योजना फसवी प्रा.डॉ.अशोक जाधव*

*सरकारची शासन आपल्या दारी योजना फसवी प्रा.डॉ.अशोक जाधव* 

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

वाशिम:-वर्तमान महाराष्ट्राच्या महायुती सरकारने राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी एका चांगल्या योजनेचा उपक्रम हाती घेतला ज्याचे  नाव शासन आपल्या दारी असे आहे. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीचे स्वरूप पाहता ही योजना महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण करण्या ऐवजी तिची फसवणूक करण्यापेक्षा अधिक जास्त काहीही नाही. त्यामुळे महायुती  सरकारची शासन आपल्या दारी ही योजना महाराष्ट्रातील जनतेच्या आशा आकांक्षांची पायमल्ली करणारी योजना ठरली असल्यामुळे सरकारची ही योजना फसवी असल्याचे मत प्रा. डॉ. अशोक जाधव यांनी व्यक्त केले. ते बहुजन समाज पार्टीच्या मासिक बैठकीच्या निमित्ताने आयोजित  17 जुलै 2023 रोजी मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी भाऊराव वासनिक होते. तर प्रमुख अतिथी प्रा. उमेश कुराडे उपस्थित होते. बहुजन समाज पार्टीच्या संघटनेच्या विस्तारीकरणावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात कारंजा मानोरा विधानसभा पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शक म्हणून आपल्या भाषणात प्रा. डॉ. अशोक जाधव म्हणाले की, महायुतीच्या सरकारची शासन आपल्या दारी ही योजना केवळ आपल्या पक्षाची,  जनतेच्या पैशाच्या माध्यमातून विस्तारीकरण करण्याची योजना आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेठीस धरून आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार करण्याचे धोरण या योजनेच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेरणीसाठी बी बियाणे देण्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांची थट्टा या निमित्ताने झाली आहे. आशा वर्कर यांना केवळ चहापानाच्या प्रलोभनावर तालुक्याच्या ठिकाणी बोलाविण्यात येते मात्र त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे संस्कार रुजविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. पावसाळ्यात अनेक गावातील घरांची पडझड झाली असताना त्याचे सर्वेक्षण न करता महसूल विभागाचे कर्मचारी आपल्या तोऱ्यात असल्याचे दिसून येते. शैक्षणिक कामासाठी विद्यार्थी व पालकांचे शोषण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यांना आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहे. शासनमान्य सरकारी रेशन दुकानातून ग्रामीण विभागातील नागरिकांची गैरसोय होताना दिसते आहे. त्यामुळे हे सरकार केवळ आपल्या पक्षाच्या ध्येयधोरणाचा विस्तार सरकारी पैशाच्या जोरावर करत आहे. बहुजन वर्ग यामुळे त्रस्त झाला असून या सरकारला योग्य धडा शिकविण्यासाठी सामाजिक न्यायाची पाठराखण करणाऱ्या बहुजन समाज पार्टीचे संघटन मजबूत करण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला पाहिजे अशा आशयाचे मत त्यांनी मांडले.बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. उमेश कुराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे अध्यक्ष भाऊराव वासनिक यांनी पार्टीचे संघटन वाढविण्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन विधानसभा सचिव विनोद किर्दक यांनी केले तर आभार विलास गजभिये यांनी मानले.

बैठकीच्या यशस्वीतेसाठी विधानसभा उपाध्यक्ष दीपक वानखडे, विधानसभा सचिव विनोद कीर्तक, विलास गजभिये बबलू दादा वाहने, रवी बडगे, अनिल दासुद. राहुल इंगळे, बाळू शिरसाट, आकाश वरघट, दीपक वरघट, आनंद वरघट, सुनील ठोंबरे, विष्णू पाटील, प्रकाश पाटील, बबन आढाव, देविदास पाडेन. धीरज पाटील, विनोद सोनवणे, विलास भगत, राहुल तायडे, भरत सावळे, नंदकुमार देवळे, अभिजीत राऊत, प्रेमानंद मनोहर, धम्मदीप धंदरे, विकास शिरसाट यांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...