Home / विदर्भ / वाशिम / *समाज क्रांती आघाडीच्या...

विदर्भ    |    वाशिम

*समाज क्रांती आघाडीच्या वतीने मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा त्रिव निषेध नोंदवत, विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले!!* *जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे हे आज जनतेने दाखवून दिले*

*समाज क्रांती आघाडीच्या वतीने मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा त्रिव निषेध नोंदवत, विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले!!*      *जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे हे आज जनतेने दाखवून दिले*

*समाज क्रांती आघाडीच्या वतीने मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा त्रिव निषेध नोंदवत, विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले!!*

 

 

जनतेच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे हे आज जनतेने दाखवून दिले

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड):* स्थानिक कारंजा, उपविभागीय कार्यालयस निवेदन विविध मागण्यासाठी  देण्यात आले. त्यामध्ये मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तिव्र निषेध नोंदवत  असताना समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे म्हणाले की, या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नसेल, स्त्रियांना लग्न करून त्यांची खुलेआम दिंड काढल्या जात असेल, त्यांच्यावर अमानुषपणे पाशवी बलात्कार होत असेल, बलात्कारानंतर त्यांचा खून केला जात असेल तर मणिपूरच्या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीच अधिकार नाही, त्या ठिकाणी सरकार बरखास्त करावं. बलात्काऱ्यांना फाशी करावी. ज्या पोलीस प्रशासनाने हेतू पुरस्कर कर्तव्यात कसूर केली. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करून अधिकाराचा गैरवापर केला अशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सेवेतून कायमची मुक्त करावे. तसेच अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्याने ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेली पिक पाण्यात डुबली. अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी. कारंजा ,मानोरा वाशिम जिल्हा अतिवृष्टी ग्रस्त घोषित करून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार एकरी मदत करावी अशा प्रकारच्या मागण्या समाज क्रांती आघाडीच्या वतीने करण्यात आल्या यामध्ये. बिरसा मुंडा क्रांती दल. सामाजिक समता प्रबोधन मंच, समता सैनिक दल. एम आय एम ए. खेड्यापाड्यातील जनता प्रचंड गर्दी फक्त निवेदन देण्यासाठी आली होती .जर समाज क्रांती आघाडीने मोर्चाचे आयोजन केले असते तर प्रचंड जनता सहभागी झाली असती. असे अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केले. हंसराज शेंडे म्हणाले की या देशांमध्ये झुंडशाही, हूकुमशाही चालू झालेली आहे. तुम्हाला लोकशाही पाहिजे असेल तर. श्रीलंकेमध्ये जसे जनतेने उठाव केला होता. तसाच उठाव भारतात होईल आणि इथले संधी साधू पक्ष संधी साधू राजकीय नेते यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही त्याचीच नादी आहे अशी हंसराज शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये विष्णू वाडेकर, राजेश मस्के, विजय वानखडे, विनायक पदमगिरीवार, विश्वनाथ राऊत,संतोष घारू, सुदर्शन थोरात, विजय सोनवणे, राजकुमार दिघडे ,अण्णा सुरजुसे, भारत भगत, विजय नन्नावरे, भारत खैरे, सुदाम शेंडे, हिवराळे मॅडम, लक्ष्मी पाढेन, सीमा सोनवणे, शिखर वर्घट, सय्यद नसिरुद्दीन. श्याम तायडे, गायक गेडाम, गायिका देवकाबाई , कुमारी अंजली सारसर, नेमिशा संतोष घारू, मंदाताई शेंडे, ग्रामीण भागातील महिला शहर भागातील महिला व पुरुष मंडळांनी या तीव्र निषेध मध्ये सहभाग घेतला होता.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...