Home / विदर्भ / वाशिम / *महाराष्ट्र शासनाने...

विदर्भ    |    वाशिम

*महाराष्ट्र शासनाने वृद्धापकाळी "सामाजिक-कार्यकर्त्याची" उपेक्षा करू नये. -दिव्यांग जनसेवक संजय कडोळे.*

*महाराष्ट्र शासनाने वृद्धापकाळी

*महाराष्ट्र शासनाने वृद्धापकाळी "सामाजिक-कार्यकर्त्याची" उपेक्षा करू नये. -दिव्यांग जनसेवक संजय कडोळे.*                            

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा (लाड):* भारतिय लोकशाहीमध्ये आदी पुरातन काळापासूनच सामाजिक कार्यकर्त्याचे महत्व आणि स्थान अबाधित राहिलेले असून,सामाजिक चळवळी मधूनच,राजे छत्रपती  शिवरायांच्या काळापासून तर इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर,झाशीची राणी लक्ष्मीबाई,लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषबाबू,महात्मा ज्योतिराव फुले,राष्ट्रपिता महात्मा गांधी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी देशभक्तांनी समाजाला स्वातंत्र्य, समानता,बंधुता,स्वराज्य,सुराज्य निर्माणाकरीता,सामाजिक कार्यामधूनच स्वातंत्र्य चळवळ उभी केली होती.हे सर्वश्रूत आहे. सामाजिक कार्यकर्त्या मधूनच मोठमोठे क्रांतिकारक,स्वातंत्र्य सैनिक,देशभक्त निर्माण झाले आणि त्यांच्या सामाजिक कार्याने प्रभावित होऊन त्यांचेसोबत एकमताने भारतिय नागरीकांनी एकत्र येऊन इंग्रजाना आपला भारत देश सोडून परत जायला भाग पाडले आणि अखेर सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या देशभक्तांच्या बलिदानामुळे अखेर आपल्या देशाला सुमारे 76 वर्षापूर्वी दि.15 ऑगष्ट 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्ती होऊन,देशात लोकशाहिचे स्वराज्य सुराज्य स्थापन झाले. हे सर्व घडले सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याच्या चळवळीमधून ! त्यामुळे शासनाने सामाजिक कार्यकर्त्याच्या मानसन्मानाची जाण ठेवून,या देशातील कोहिनूर रत्न असणाऱ्या,प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला समाजा प्रती आणि देशाप्रती पाठबळ मिळावे,प्रोत्साहन मिळावे याकरीता सामाजिक कार्यकर्त्यांचा शासनाने आदर सत्कार करून,त्यांच्या भविष्याची-वृद्धापकाळाची तरतूद करावयास हवी आहे.वास्तविक यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्याना सन्मानाची वागणूक देण्याकरीता, महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून इ .सन 1971-72 पासूनच,सामाजिक कार्यकर्त्याना, शासनाकडून सन्मानीत करण्याकरीता,पुरस्कारीत करण्याकरीता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्याची योजना सुरु केली. सर्वप्रथम 1989 मध्ये या पुरस्काराचे नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार असे होते.मात्र पुढे या पुरस्काराचे नामकरण  "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार" असे करण्यात आले.या दरम्यान राज्यात विविध राजकिय पक्षांची सरकार अस्तित्वात आली व त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्याना आजता-गायत सन्मानित सुद्धा केलेले आहे.ही झाली सामाजिक कार्यकर्त्यांना शासनाकडून सन्मानित करण्याची सकारात्मक गोष्ट.मात्र यापुढची महत्वाची समस्या म्हणजे शासनाने सामाजिक कार्यकर्त्याचे पुनर्वसन व उदरनिर्वाहाची जबाबदारी घ्यायला हवी होती.ती समस्या मात्र अद्यापही प्रलंबितच आहे. याविषयी स्पष्टच सांगायचे म्हणजे आपल्या हयातीत संपूर्ण आयुष्यभर राब राब राबून समाजसेवा व पर्यायाने देशसेवा करणाऱ्या फाटक्या दारिद्रयवस्थेतील या सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याच्या वृद्धापकाळातील निवासाकरीता महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाकडून,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारार्थी यांना 100% अनुदानावर घरकुल दिले पाहीजे.व उदरनिर्वाहा करीता दरमहा सामाजिक कार्यकर्ता  निवृत्ती वेतन म्हणून दरमहा मानधन द्यायला हवे आहे. मध्यतंरी मंत्रालयात,दि 28 ऑक्टोंबर 2021 रोजी तत्कालिन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना धनंजय मुंडे यांच्या दालनात सामाजिक कार्यकर्त्यांच्या दरमहा निवृत्ती वेतन मानधन देण्याबाबत प्रस्ताव मंजूरही करण्यात आल्याचे विश्वसनिय वृत्त मिळाले होते.परंतु पुढे महाराष्ट्रात कोरोना महामारी सुरू झाली आणि मंत्रालयाच्या बैठकी बंद पडल्या. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याच्या विकासाचे कामकाजही बंद पडले.नंतर सरकारही बदलली. ह्याच वस्तुस्थितीमुळे सन 2017-18 पासून,महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक कार्यकर्त्याच्या राज्यस्तरिय सन्मानसोहळ्याचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमही बंद पडले. व तेव्हापासून सामाजिक कार्यकर्त्याची उपेक्षा करण्यात येऊन त्यांना सपशेल दुर्लक्षित करण्यात आले.त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षापासून,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रमही,प्रत्यक्ष शासनाकडून,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने,आयुष्यभर स्वतःचे घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाची सेवा व जनजागृती करणाऱ्या निःस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या,सामाजिक कार्यकर्त्याना अविलंब डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन,दरमहा (सेवानिवृत्ती वेतन) मानधन सुरू करण्याची रास्त मागणी,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारार्थी असलेले दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमत्री ना.अजितदादा पवार, द्वितीय उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस,प्रधानसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय मुंबई,आयुक्त - समाज कल्याण सचिवालय पुणे यांचेकडे लावून धरली असल्याचे दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी कळविले आहे .

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...