Home / विदर्भ / वाशिम / *कि. न .महाविद्यालयात...

विदर्भ    |    वाशिम

*कि. न .महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळा संपन्न!!*

*कि. न .महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळा संपन्न!!*

*कि. न .महाविद्यालयात पदवी प्रदान सोहळा संपन्न!!*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा(लाड)* : स्थानिक कारंजा येथील श्री किसनलाल नथमल गोयनका कला वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला.

दि बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतिसिंह मोहता, सचिव पवन माहेश्वरी, कार्यकारिणी सदस्य डॉ. अजय कांत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय कोडापे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे. सी. चवरे विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक श्रीनिवास जोशी उपस्थित होते. यावेळी मंचावर मानव्य विद्या शाखा समन्वयक प्रा. डॉ. प्रदीप येवले व वाणिज्य विभाग समन्वयक प्रा. डॉ. दिनेश रघुवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत प्रा. डॉ. सुनील राठोड, प्रा. ओंकार पवार व प्रा. घननीळ गजभिये यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते एम. ए. इतिहास व गृह अर्थशास्त्र विभाग तसेच बी.ए. व बी.कॉम. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनात श्रीनिवास जोशी यांनी पदवीचा उपयोग स्वतः सोबतच समाज व देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्यातील कौशल्य ओळखून, अधिकाधिक ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन जोशी यांनी केले. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. विनय कोडापे यांनी आपल्या गुरुपेक्षाही आपलं नाव मोठे करण्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

वाणिज्य शाखेतील पदवीधरांच्या नावाचं वाचन डॉ. दिनेश रघुवंशी यांनी तर कला शाखेतील पदवीधरांच्या नावाचं वाचन डॉ. प्रदीप येवले यांनी केले. संचालन प्रा. डॉ. किरण वाघमारे यांनी तर आभार प्रा. घननीळ गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...