Home / विदर्भ / गडचिरोली / *धानाच्या चुकार्‍याचे...

विदर्भ    |    गडचिरोली

*धानाच्या चुकार्‍याचे मिळालेले पैसे हरविले अखेर झिगांनूर पोलीसांच्या मदतीने परत मिळाले*

*धानाच्या चुकार्‍याचे मिळालेले पैसे हरविले अखेर झिगांनूर पोलीसांच्या मदतीने परत मिळाले*

*धानाच्या चुकार्‍याचे मिळालेले पैसे हरविले अखेर झिगांनूर पोलीसांच्या मदतीने परत मिळाले*

 

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली .

 

 

झिंगानूर:-उपपोलीस स्टेशन झिंगानूर हद्दीत येणारा मंगीगुडम या गावातील सुभाष पेन्टा गावडे, या व्यक्तीचे वर्षभरापासून मेहनत करून पिकविलेल्या धानाची विक्री करून जमा झालेले तीस हजार रुपये रंगय्यापल्ली येथून घेऊन झिंगानूर मध्ये आल्यानंतर बाजार करे पर्यंत झिंगानूर मध्ये तीस हजार रुपये ठेवलेली पिशवी हरवली. सदर व्यक्तीने शोध घेऊन सुध्दा पैसे मिळून येत नसल्याने पत्नी व मुला बाळांसह. पो स्टे ला येऊन घडलेला सर्व प्रकार सांगुन रडू लागले. तेंव्हा सामाजीक कार्यकर्ता रामचंद्र कुमरी यांनी धीर देऊन त्यांना पैसे मिळून देऊ असे आश्वासन दिले आणि सदर व्यक्ती खरे बोलत असल्याची खात्री करून पो. उप.नि राहुल घुले, पो उप नि मारोती नंदे, पो उप नि अभिजित घोरपडे व पो शि./ दीपक सडमेक. असे झिंगानूर मधील सर्व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने सुभाष गावडे हा ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे कसोशीने चौकशी करून मोठ्या शिताफीने ज्या व्यक्तीला पैसे सापडले त्याचा शोध घेऊन सदर व्यक्तीचे पैसे त्यांना परत करण्यात आले तेंव्हा त्याची पत्नी व मुले बाळ यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारण या पैश्यात त्यांचे एक वर्षाचे राशन पाणी घ्यायचे होते. आणि जर पैसे मिळाले नसते तर त्यांचा कुटुंबांवर उपास मारीची वेळ आली असती. त्यामुळे सुभाष गावडे. व त्याच्या कुटुंबाने झिंगानूर उप. पो. स्टेशन. च्या सर्व अधिकार व अंमलदार यांचे आभार मानले. तरी झिंगानूर उप पो स्टेशन हद्दीतील नागरिकांनी धान्य विक्री करून मिळणाऱ्या पैसे बँकेतून घेऊन येताना गोपनीयता बाळगावी असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आली.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...