Home / यवतमाळ-जिल्हा / आर्णी / *रोजगार मेळाव्यात १७६...

यवतमाळ-जिल्हा    |    आर्णी

*रोजगार मेळाव्यात १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड*

*रोजगार मेळाव्यात १७६  उमेदवारांची प्राथमिक निवड*

 

 

 

यवतमाळ, दि २४ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आर्णी यांचे संयुक्त विद्यमानाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्णी येथे करण्यात आले होते. सदर रोजगार मेळाव्या मध्ये एकुण १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

 

 

या मेळाव्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ एलआयसी ऑफ इंडिया, दिग्रस मॅक वेहिकल प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, मेगाफीड बायोटेक, नागपूर, पिआयजीओ, बारामती/ पुणे, आर्म्स प्रायव्हेट लिमिटेड वाळूंज औरंगाबाद इत्यादी कंपन्यांनी त्यांच्याकडील एकूण ११५८ रिक्त पदांकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सदर रोजगार मेळाव्याचा एकूण २३६ उमेदवारांनी लाभ घेतला असून त्यापैकी १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे आणि सुधीर पटबागे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ इत्यादी महामंडळांनी त्यांचेकडील योजने विषयीची माहिती सांगून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याच्या आवाहन उमेदवारांना केले.

००००००

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

आर्णीतील बातम्या

नवउदयोन्मुख कवयित्री कु पूर्वी विलास मडावी ची आई या विषयावर काव्यरचना

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री...

आकपुरी, लोणबेहळ, मुडाना, विडुळ गावातील "शासन आपल्या दारी शिबिराला" जिल्हाधिकारी यांची भेट

यवतमाळ :-नागरिकांना सर्व विभागाच्या योजनांची माहिती आणि त्यासाठीचे अर्ज गावातच उपलब्ध व्हावे,तसेच दैनंदिन कामासाठी...

*धुलीवंदन ‍निमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद*

यवतमाळ, दि ३ मार्च (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यात ७ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व...