Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / "समाजातील उपेक्षित...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

ads images

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा"

 

  वाढदिवस अभिष्टचिंतन 

 

✍️ श्रीकांत लोखंडे

  कळम प्रतिनिधी

 

  राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पळसखुंड गावात आज एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. हा वाढदिवस तुमच्या आमच्या दररोजच्या वाढदिवसारखा नक्कीच नव्हता, कारण त्यात प्रेम, आपुलकी, मानवता, आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा एक "विचार -आचार"अन् कृतीशीलतेचा परिपाठही होता.

       वाढदिवस हा आनंदाचा क्षण वर्षातून एकदाच येतो ‌. वर्षातून एकदाच येणार हा वाढदिवस म्हणजे आपण जन्माला आलेला दिवस , डॉ. एपीजे अब्दुल कलाम असे म्हणतात की वाढदिवस म्हणजे तो क्षण कि आपल्या रडण्याने संपूर्ण कुटुंब खुशीत/हसत असते .. त्या नंतर तसा दिवस कधीही येत नाही त्याला वाढदिवस असे म्हणतात .आणि या दिवशीच या आयुष्याच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करीत असतो.

   हा वर्षातील असाच एक प्रसंग आहे जो लहान मुलापासून ते थोरल्यापर्यंत व थोरल्यापासून तर वृद्धापर्यंत सर्वांसाठी खास असतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा खास सोहळा साजरा करतात. वाढदिवसाला येणारा प्रत्येक संदेश हा खूप खास असतो वाढदिवस म्हटला की शुभेच्छा आल्यास आणि त्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाला आपल्याला मनाच्या भावना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करता याव्यात अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्याचा जणू ट्रेंडच आलाय. दिवसेंदिवस वाढदिवसाची परिभाषा बदलत चाललेली आहे युवकांचा कल मोठ-मोठे हॉटेल्स, केक, बर्थडे सेलिब्रेशन, पार्टी, डीजे, डान्स, जीवावर भेतणाऱ्या कॅण्डल, हायर फाॅग, फटाके वाजवून. केक भरवण्याचा सोडून त्याच्या तोंडात मावत नाही असा केक भरवणे, त्यांच्या चेहऱ्याला केक लावणे, व मोठ्या गिफ्टची अपेक्षा करणे. अशा नानाविध संकल्पाला बाजूला सारून आमच्या ओम भाऊ फुटाणे यांनी वेगवेगळ्या स्वरूपात आपला वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

   मित्रांनो आपण समाजामध्ये अनेकांचे वाढदिवस पाहतो परंतु ओम भाऊ फुटाणे हे त्यांचा वाढदिवस दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात.ते त्यांच्या वाढदिवसाला नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेऊन जसे की वृद्धाश्रमाला भेट घेऊन त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करणे, रक्तदान शिबिर घेणे, अनाथ मुलांना खाऊ वाटप,गोर- गरिबांना मदत करणे, अशा विविध उपक्रमातून ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि समाजाची बांधिलकी जपण्याचं काम करतात ‌.

    परंतु आज त्यांनी ज्या ठिकाणी जाऊन आपला वाढदिवस साजरा केला म्हणून मला त्या व्यक्तीचे कौतुक करावे असे वाटते. कारण राळेगाव तालुक्यातील अतिशय डोंगराळ व दुर्गम भागात असलेले पाडा ,वस्ती, पौड, म्हणजे पळसखूडं हे गाव . लोकसंख्या जेमतेम 900 ते 1000 लोकसंख्येचे हे गाव आहे .या गावात ना शैक्षणिक सुविधा,ना वीज_,ना आरोग्याच्या सोई-सुविधा व पाण्याची अपुरी सोय अशा या दुर्गम आदिवासी बहुल पारधी, गोंड ,कोलाम , अतिशय उपेक्षित वंचित असल्याने त्यांना वाढदिवस काय आहे... कसा असतो हेही त्यांना माहित नाही अशा लोकसमूहात जाऊन गोर-गरीब मुलांसोबत अतिशय साध्यापणाने आपला वाढदिवस साजरा करून युवकासमोर त्यांनी जणू काही आदर्श ठेवला आहे ही व्याख्याने जोगी गोष्ट आहे.

      सामाजिक भान ही जी वृत्ती समाजाप्रती, देशाप्रती कुठून आली याचे मूळ कारण म्हणजे त्यांच्या घरातील लोकाभुमीत वातावरण. "ते म्हणतात ना की लहान मुलं हे निरीक्षणांनी शिकतो"लहानपणापासून त्याच्यांवर हे बाळकडू आपल्या वडीला कडून म्हणजे मा. श्री अरविंद दादाजी फुटाणे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी राळेगाव हे ज्या प्रकारे लोकांसाठी अहोरात्र विविध क्षेत्रात सेवा देत आहे जसे की सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून सामान्य माणसासाठीचे कार्य खूप मोलाचे आहे. "जनसेवा हीच ईश्वर सेवा"मुक्ती प्रमाणे फुटाणे परिवाराचे दरवाजे नेहमी खुले असतात.... जनसामान्याबद्दल माया ,प्रेम ,वासल्य, समाजकार्याचे धडे आपल्या आई-वडिलांकडून गिरवले आहे. त्याच प्रेरणेतून या दुर्गम भागात शिक्षणाचे दारी खुले व्हावे यासाठी सावरखेडा या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था कृष्णापुर द्वारा संचालित स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा ता राळेगाव जिल्हा यवतमाळ च्या संस्थापिका अध्यक्ष सौ उज्वला अरविंद फुटाणे हे त्यांच्या आई असून आदिवासी दुर्गम डोंगराळ भागांमध्ये शिक्षणाचा प्रसार -प्रचार होण्यासाठी हे कमवी काढण्यात आले.आणि या क मी वित विनामूल्य शिक्षण दिल्या जाते. त्या आपल्या पती व मुलांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात तसेच मनोबल वाढवण्याचे कार्य ते करत असते. तसेच ओम भाऊ फुटाणे हे दादाजी फुटाणे (ग्रामसेवक)व अशोकरावजी महाजन (सरपंच राळेगाव) यांचा नातू आहे सामाजिक वसा हा रक्तातुनच उतरला आहे असे वाटते.

     आपल्या आप्तसोकीय मित्रपरिवार आई-वडिलांना सामान्य लोकांसाठी करीत असलेले कार्य, मदतीला धावून जाणे, हे ओम भाऊ फुटाणे यांनी अगदी लहानपणापासूनच जवळून पाहिले आहे म्हणून त्यांच्यातही सामान्य लोकांविषयीची तळमळ आपुलकी माया प्रेम वासल्य या भावनांचा विकास त्यांच्या दिसून येतो तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यवतमाळमध्ये त्यांची ख्याती आरोग्य सेवक म्हणून गणली आहे. कोरोना काळात आपल्या क्षेत्रातील बरेचशा लोकाचें त्यांनी प्राण वाचवले... आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांच्या मदतीला धावून जाणारे.. कधी व केव्हाही मदतीची हाक मारल्यास सर्वात समोर असणारे , अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला आपल्या गाडीमध्ये बसून हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्यांना जीवनदान दिले . बरेचशा व्यक्तीला कधी ब्लड लागल्यास तुरंत उपलब्ध करून देण्यासाठी डोनर अथवा स्वतः कितीतरी वेळा त्यांनी ब्लड दिले. अशा या समाजभूमीक कार्यासाठी सलाम.

         ओम भाऊ फुटाणे यांच्या कलागुणाला वाव मिळावा, त्यांच्यातील गुण विकसित करण्यासाठी, काही उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक जानिव करूना ,बांधिलकी, समाजाप्रतीचे कार्य,आपन समाजाचे  काही देणं लागतो ही वृत्ती जागृत करण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य एस डी लाकडे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खुप मेहनत घेतली व सहकार्य सुध्दा आहे असे तो म्हणतो.

  खरंतर शब्दाला कोड पडावं अशी काही माणसं असतात त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे ओम भाऊ फुटाणे त्यांच शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही एवढं अप्रतिम कार्य त्यांच आहे.

    दाणे नसलेली कंस आणि भान नसलेली माणसे काय कामाची नसतात आणि समाज विघातक पद्धतीने वाढदिवस साजरी करनारी मानसे काय कामाची नसतात. परंतु समाजाचे भान ठेवून समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरी करणारी लोक फार थोडी असतात त्यापैकीच आपले ओम भाऊ फुटाणे. दरवर्षी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम ते वाढदिवसाला करतात त्यामुळेच समाजामध्ये त्यांची ख्याती आहे आपण सुद्धा अशाच व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाढदिवस साजरे केले पाहिजेत अशी अपेक्षा करतो.

  उत्तुंग  व्यक्तिमत्वप्राप्ती असलेल्या अव्यक्त भावनांना शब्दरूपात व्यक्त करून त्यांच्या योगदानाला अभिवादन करावे आणि युवकांनी व समाजाने प्रेरणा घ्यावी हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा.

  त्यांचे भावी आयुष्य सुखाचे, समाधानाचे ,आनंदाचे, भरभराटीचे जावो, त्यांच्या हातून देशाची ,आई -वडिलांची, समाजाची सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

ads images

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कळंबतील बातम्या

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...

लोकशाही दिनात १३२ तक्रारी

*भारतीय वार्ता * यवतमाळ,दि.६ मार्च (जिमाका):-संबधित विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनातील सर्व अभिकथने/गाऱ्हांनी लवकरात...