Home / महाराष्ट्र / मराठवाडा / कर्मयोगी स्व. डॉ शिवाजीराव...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

कर्मयोगी स्व. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळ्यास उपस्थित रहा. माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आवाहन !!

कर्मयोगी स्व. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळ्यास उपस्थित रहा.    माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आवाहन !!

कर्मयोगी स्व. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळ्यास उपस्थित रहा.

 

माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आवाहन !!

 

     उत्तम माने

मो.नंः 8484878818

 

लातूर/ निलंगा : - कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणान्या कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंती दिनी दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांच्या स्मारकाचे अनावरण सोहळा दिमाखात संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. तत्पूर्वी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भुमिपुजन संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, सचिव वान सरतापे, भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, स्मारक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ भागवत पौळ, माजी प्राचार्य दिलीपराव धुमाळ, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कोलके, उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड, माजी जि सदस्य भरत गोरे अदी उपस्थित होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री बाळासाहेब घोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार उपस्थित राहणार आसल्याचे संयोजकांनी सांगितले. माजी मंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी साहेबांच्या आठवणी सांगताना साहेबांनी उभा केलेले काम आभाळाच्या उंचीचे आहे.

त्या कामाकडे पाहूनच आपली वाटचाल सुरू आहे. त्यांच्या पुण्याईमुळेच आज मी राजकारणात विविध पदांवर काम करु शकलो असे सांगत औरंगाबाद येथील हायकोर्टाच्या मंजूरीसाठी निलंगेकर साहेबांनी केलेल्या प्रयत्नाची उकल त्यांनी केली. आज औरंगाबाद हायकोर्ट झाले नसते तर आपणाला नागपूर किंवा मुंबई येथे जावे लागले असते. आज हायकोर्टात ८५०० पेक्षा अधिक लोक काम करतात. नुकतेच त्यांचे तैलचित्राचे अनावरण हायकोर्टात झाले. हि आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगत स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले, तर अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले निलंगेकर साहेबांवर निलंगेकर कुटुंबापेक्षा जास्त अधिकार निलंग्याच्या नागरिकांचा आहे. त्यामुळे आपला घरचा कार्यक्रम म्हणून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारक सोहळ्यासाठी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या भव्य सभामंडपाचे माजीमंत्री आ संभाजीराव पाटील निलंगेकर व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते माधवाचार्य महाराज यांच्या मंत्रोच्चारणाने पुजन करुन भुमिपुजन करण्यात आले.

यावेळी विजयकुमार पाटील निलंगेकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ भागवत पौळ, प्राचार्य डॉ माधव कोलके, दिलीपराव धुमाळ अदीसह स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते

कर्मयोगी उपाधी कशामुळे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विकासाची गंगा आणली होती. अनेक जलसिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नातून पुर्णत्वास गेले. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या खंडपिठाची स्थापना यासह विविध विकासाच्या योजना त्यांच्या काळात कार्यान्वीत झाल्या. त्यामुळेच त्यांना कर्मयोगी म्हणतात. एक वेळ महाराष्ट्राच्या विधीमंडळात शिवाजीराव पाटील नावाचे तीन आमदार होते. त्यामुळे डॉ. शिवाजीराव पाटील यांना त्या काळी निलंगेकर म्हणून संबोधले जायचे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...