Home / महाराष्ट्र / कोकण / वर्ष 2023, नविन संकल्प...

महाराष्ट्र    |    कोकण

वर्ष 2023, नविन संकल्प !! *सदर क्रमांक:-52, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान*

वर्ष 2023, नविन संकल्प !!    *सदर क्रमांक:-52, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान*

भारतीय वार्ता 

 

जगदीश का. काशिकर,

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

*ग्राहक साक्षरता अभियान*

 

*प्रश्न*: सात-बारा सदरी बिनशेतीची नोंद घेण्याची पध्दत कशी असते?

 

*उत्तरः* मा. जिल्हाधिकारी, मा. अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्रथम तहसिलदार कार्यालयात बिनशेती आदेश पाठविले जातात. अशा वेळेस सदर आदेशाची नोंद सात-बारा सदरी करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

 

★ बिनशेती आदेश प्राप्त झाल्यावर तहसिलदार कार्यालयाने सर्वप्रथम अशा नोंद तालुका नमुना नं. २ मध्ये नोंदवावी.

 

★ तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक सदर बिनशेती आदेशावर नमुद करुन हा आदेश संबंधीत तलाठी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा.

 

★तलाठी यांनी खातेदाराकडून परस्पर बिनशेती आदेश घेऊन नोंदी करण्याचे टाळावे. तहसिलदार कार्यालयाकडून, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक असलेल्या आदेशाचीच नोंद फेरफार सदरी  नोंदवावी.

 

★असा फेरफार मंजूर झाल्यानंतरच सात-बाराच्या इतर हक्कात "बिनशेती" अशी नोंद करावी. बिनशेती ही संपूर्ण क्षेत्रासाठी आहे किंवा अंशत: क्षेत्राची आहे ते स्पष्टपणे नमुद करावे.

 

★सात-बारा स्वतंत्र करतांना भूमी अभिलेख विभागाकडून क.जा.प. प्राप्त झाल्यानंतरच सक्षम अधिकाऱ्याचा बिनशेती आदेश, क.जा.प. व सनद बघुनच स्वतंत्र सात-बारा तयार करावा. क.जा.प. नुसार गाव नमुना नंबर १ ला दुरुस्ती करावी.

 

★ओपन स्पेस व रस्ता यांच्या क्षेत्रासाठी कब्जेदार सदरी स्थानिक प्राधिकरणाची नोंद करावी आणि अॅमिनिटी स्पेसच्या क्षेत्रासाठी कब्जेदार सदरी मालकाच्या नावाची नोंद करावी.

 

उदाहरणार्थ: जर एखाद्या जमिनीचे क्षेत्र ४० आर आहे आणि पूर्ण ४० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश असल्यास फेरफार सदरी बिनशेती आदेश क्रमांक, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक, क्षेत्राचे विवरण म्हणजेच ओपन स्पेस, अॅमिनिटी स्पेस, रस्ता, रोड साईड मार्जिन यांचे क्षेत्र व प्लॉटचे निव्वळ क्षेत्र नमुद करावे. त्यानंतर सात-बारा सदरी इतर हक्कात "बिनशेती" अशी नोंद करावी.

 

★जर एखाद्या जमिनीचे क्षेत्र ४० आर आहे आणि फक्त २० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश असल्यास फेरफार सदरी तसे नमुद करुन बिनशेती आदेश क्रमांक, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक, क्षेत्राचे विवरण म्हणजेच ओपन स्पेस, अॅमिनिटी स्पेस, रस्ता, रोड साईड मार्जिन यांचे क्षेत्र व प्लॉटचे निव्वळ क्षेत्र नमुद करावे. त्यानंतर सात-बारा सदरी इतर हक्कात "बिनशेती" अशी नोंद करावी आणि बिनशेती जितक्या क्षेत्रासाठी आहे ते क्षेत्र नमूद करावे.

 

लेखक - डॉ. संजय कुंडेटकर, (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन)  

 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर (रिअल इस्टेट कन्सलटन्सट), कोल्हापूर.

मोबाईल: 7350201000, 8459348218.            

 

*जमिनीच्या वादाची कारणे:- कायदा  नियमांचे अज्ञान, सामाजिक प्रतिष्ठा, इर्षा, महत्वाकांक्षा, व्देष, यांमुळे होणारी अडवणूक व बेकायदेशीर कामे, जनता व प्रशासनात सुसंवादाचा अभाव, योग्य सल्ल्याचा अभाव, अचूक कार्यपद्धतीची माहिती नसणे, सातबारा पुर्नलेखनामध्ये झालेल्या चुका, सातबारा संगणकीकरणामध्ये झालेल्या चुका, कुटुंबांतर्गत वाद इत्यादी.*

 

*विशेष निवेदन* - 140 कोटी भारतीयांचा सुखाचा जीवन कल्याणाचा मार्ग सांगणारे तसेच , शासन कारभारात पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे म्हणून आपण आपल्या संग्रही *संविधान ग्रंथ* व *माहिती अधिकार अधिनियम 2005 असणे आवश्यकच आहे.*

 

सहकारी संस्थेचा सहकार कायदा (सोसायटी) व ओनरशिप कायदा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी श्री जगदीश काशीकर यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) / (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा व हा ग्रूप/पेज पसंद करुन त्यात  सामिल व्हावे ही मनापासुन विनंती करत आहेत.

 

ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली चार ते पाच वर्ष तनावात असलेल्या मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीवर दिड वर्षभरापुर्वि प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी (देखभाल खर्च दर महिन्याला पाच हजार आकारून) आपल्या ताब्यात घेतली होती व येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि

 

राजकिय पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्क्षित गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून (अहवाल सादर करुन किंवा योग्य त्या शासन यंत्रणेकडुन पुढील कारवाई करून) सोसायटी पुन्हा भविष्यात नवीन कमिटी स्थापुन नवीन सोसायटी कमिटी/सभासदांकडुन कोमल रहिवाशी सोसायटी व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणताहि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतील योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला/नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूका मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे.

 

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

 

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.

 

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कोकणतील बातम्या

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी...

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....