Home / विदर्भ / बुलढाणा / डाॕ.बाबासाहेब आंबेडकर...

विदर्भ    |    बुलढाणा

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सोवा निमित्त प्रबोधनकार अॕड सतीषचंद्र रोठे यांनी बहुजना प्रती समर्पीत केलेला उपरोक्त लेख

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सोवा निमित्त प्रबोधनकार अॕड सतीषचंद्र रोठे यांनी बहुजना प्रती समर्पीत केलेला उपरोक्त लेख

डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सोवा निमित्त प्रबोधनकार अॕड सतीषचंद्र रोठे यांनी बहुजना प्रती समर्पीत केलेला उपरोक्त लेख

 

 

✍️वसंत जगताप

  बुलढाणा

 

फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा विजय म्हणजे महामानव डॉ.बी.आर.आंबेडकर जयंती उत्सव होय.

शोषित,पीडित,दिन,वंचित प्रत्येकाच्या जात,धर्म,पंथ वर्ण व्यवस्थेला बाजूला सारून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वस्व समर्पित करून माणुसकी ,मानवतेची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर._

 

_यांच्या जयंती उत्सवाला लोकप्रबोधनातून प्रामुख्याने महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्यानंतर देशात जगात भीमउत्सव लोकप्रबोधनातून साजरा होतो आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या लोकप्रबोधनाची फलश्रुती होतांना दिसत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरीत खिचपत पडलेल्या, मानसिक दृष्ट्या विकलांग झालेल्या आणि स्वाभिमानाची जाणीव नसलेल्या विश्वातील मानव जातीला संघर्षाची मशाल दिली.

 

तर संघर्षाची मशाल तेवत ठेवण्यासाठी प्रबोधन हे एकमेव बहुआयामी शस्त्र त्यांनी उपयोगात आणले.

पाहता पाहता नव सकाळ उगवली. कोट्यावधी लोकांमध्ये जनजागृती झाली. त्यांच्यातील माणूस,व माणुसकी जिवंत झाली.

झोपलेले,मेलेले मुर्दाळ समाजमन जिवंत झाले. वामनदादा कर्डक यांच्यासारख्या महाकवींचा जन्म आंबेडकरी चळवळीतून झाला.

 

माझ्या शंभर भाषणापेक्षा वामनदादांचं एक गीत प्रभावी असल्याचं मत बाबासाहेबांनी व्यक्त केलं.

ज्यामुळे लोक प्रबोधनाची चळवळ आनखी गतिमान व्हायला सुरुवात झाली. लोककला,लोक संस्कृती,गीत, भारुड,अशा असंख्य प्रबोधनात्मक लोककलेला बाबासाहेबांनी पुनर्जित करून नवसंजीवनी दिली.

तेव्हापासून आंबेडकरी चळवळीचा जलसा प्रबोधनाच्या भरभक्कम पायावर गतिमान झाला.

मनामनात स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचे बीजारोपण झाले. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा बुलंद झाला.

त्यामुळेच एका नवक्रांतीचे बीजारोपण झाले. कोणतेही शस्त्र हातात न घेता प्रबोधनाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून मनामनात क्रांती पेटू शकते. सामान्यांच्या वेदनावर फुंकर घालता येऊ शकते. कितीही मोठी हुकूमशाही असली तरी ती उखडून फेकता येते‌. फक्त गरज आहे ती आपल्यातील क्षमता ओळखन्याची.

मरगळ आलेल्या मनाला जिवंत करण्याची. हा विचार संदेशच आंबेडकरी चळवळीने सामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यामुळेच लोकप्रबोधनातून साहित्य निर्मितीला सुरुवात झाली.

मग मानसिक गुलामगिरीत खिचपत पडलेल्या तेली, कोळी,माळी, कुंभी अशा असंख्य बहुजनांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव झाली. बहुजन समाजासाठी,महिला, कष्टकरी,कामगार, विधवा,परितक्ता, बाल संगोपनात असलेल्या महिलांना दिलेल्या सवलती आणि आरक्षणाची किमया कळायला लागली.

 

देशातील बहुतांश नागरिकांना महिलांना सवलतीच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची किमया जाणवली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सर्व समावेशक बाबासाहेबांच्या लोकसमूहाला वाढत्या लोकप्रियतेला प्रतिबंध घालण्यासाठी काही तथाकथित प्रस्थापितांनी विरोध करायला सुरुवात केली.

तिथून खऱ्या अर्थाने संघर्षाची ठिणगी पुन्हा पडली. त्यानंतर दलीत पॅंथर सारख्या असंख्य लढाऊ चळवळींचा उदय झाला. कालांतराने प्रस्थापितांचे मिशन तेच होते फक्त कटकारस्थानाची पद्धती बदलल्या. हल्ले प्रति हल्ले सुरूच होते. आजही सुरूच आहेत. आज फक्त फरक एवढाच आहे. बहुजन समाज शिकला. संघटित झाला.संघर्षही करत आहे. फक्त काही अंशी संघर्षाची धार बोथट झाली आहे.

 

निस्वार्थ समाजहित, देशहित काही अंशी केंद्रित  झाल्यामुळेच महाकवी वामनदादा म्हणतात *भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीच्या पात्याचे न्यारेच टोक असते*,

 

*वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, भिमा तुझ्या पिल्लांचे वर्तन चोख असते*

 

या.. लोककाव्यातीत या ओळी समाजाची व्यथा अधोरेखित करतात. ही संवेदना, वेदना निष्ठावान आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नव संजीवनी

तर हूजरेगीरी करणाऱ्यांच्या  जीव्हारी लागण्यासारखीच आहे. खरंतर महाकवी वामनदादा कर्डक यांनी चार -पाच दशक आंबेडकरी जलसा, विचारधारा तेवत ठेवण्याचे कार्य केले.

 

त्यामधूनच पुन्हा लोकप्रबोधनाच्या चळवळींनी गतिमानता घेतली. तीच गतिमानता आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकप्रबोधनाच्या कार्यक्रमातून कृती प्रवन होत आहे.हाच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याग,व समर्पणाचा विजय आहे.फुले शाहू आंबेडकरी विचारांचा विजय म्हणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज जगात, देशात साजरी होत आहे. याचा सार्थ अभिमानच प्रत्येक भारतीयाला आहे  व राहणार._

__________________

( प्रबोधनकार - अँड.सतीशचंद्र रोठे, बुलढाणा, 9637230999.)

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

बुलढाणातील बातम्या

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी*

*नॕशनल अबॕकस स्पर्धेत धा.बढे येथिल रिया सागर बारी मराठवाड्यातुन गुणवत्तेत सर्वात पडली भारी* ✍???? रिपोर्टर वसंत जगताप...

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल*

*खबरदार उघड्यावर शौचास जाल तर गुड माॕर्निंग पथकाच्या कारवाईस पात्र व्हाल* ✍???? वसंत जगताप बुलढाणा मोताळा तालुक्यात...