Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / *जिल्हास्तरीय प्राणीक्लेष...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

*जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंध सोसायटीत नविन अशासकिय सद्स्यांसाठी अर्ज आमंत्रित*

*जिल्हास्तरीय प्राणीक्लेष प्रतिबंध सोसायटीत नविन  अशासकिय सद्स्यांसाठी  अर्ज आमंत्रित*
ads images

 

 

यवतमाळ,दि.२८फेब्रुवारी (जिमाका): -

प्राण्यांना त्रास होणार नाही याबाबत काळजी घेण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियमान्वये यवतमाळ जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करण्यात आली होती.

सदर जिल्हास्तरीय प्राणिकलेश प्रतिबंधक समितीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्तीची  तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी

प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व प्राणीप्रेमी व्यक्ती, संस्थांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.

 

केंद्र शासनाच्या प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राणी क्लेश प्रतिबंधक नियम २००१ मधील नियम ३ च्या उपनियम १ अन्वये  १४ मार्च २०१७ च्या अधिसूचनेद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे.

त्याकरिता १)अशासकीय सदस्यांमध्ये एक नोंदणीकृत गोशाळा किंवा पांजरपोळ या संस्थेमधून एक सदस्य २)प्राण्याच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या धर्मदाय संस्थेतील व्यक्ती यापैकी दोघांची निवड ३)सर्वसाधारण मंडळांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती पैकी दोन सदस्य ४) प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व प्राणीप्रेमी व मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या व्यक्ती मधून पाच ते सहा सदस्य अशाप्रकारे नियुक्ती करण्यात येते. सदर अशासकीय सदस्यांची नियुक्ती कालावधी संपल्यामुळे नविन अशासकिय सदस्यांची नियुक्ती  करण्यासाठी सदर अर्ज मागविण्यात येत आहे.

 

तरी इच्छुकांनी (प्राण्याविषयी सेवाभावी वृत्ती तसेच गोशाळा,पांजरपोळ संबंधित कार्य करणारे)अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय,हनुमान आखाडा जवळ,चांदणी चौक,यवतमाळ या कार्यालयात  ३ मार्च २०२३ पर्यंत विहित पध्दतीने फोटोसह अर्ज सादर करावे. सदर अर्ज  पशुसंवर्धन उपायुक्त

कार्यालयात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९४२०१२७७८५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.राजेंद्र अलोणे यांनी केले आहे.

          ०००००००

ads images

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...