Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / *राष्ट्रीय युवा स्वयंसेवक...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

*राष्ट्रीय युवा स्वयंसेवक बणण्याची युवकांनी सुवर्ण संधी*

*राष्ट्रीय युवा स्वयंसेवक बणण्याची  युवकांनी सुवर्ण संधी*
ads images

भारतीय वार्ता 

 

यवतमाळ,दि.२८ फेब्रु:-

जिल्ह्यात युवकाचे नेटवर्क  तयार करणे,भारत सरकारच्या विविध योजनेत युवकांना सहभागी करून घेऊन युवकांचे सक्षम नेतृत्व स्वीकारून राष्ट्र निर्माण कार्यात योगदान देण्याची जिल्ह्यातील युवकांना सुवर्णसंधी आहे. नेहरु युवा केंद्रामार्फत प्रत्येक तालुक्याकरिता दोन राष्ट्रीय युवा स्वयंसेवक निवडण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील युवकांकडुन ९ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

 

युवकांनी त्यांची उर्जा व क्षमता स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण कार्यात वापरण्यासाठी तसेच साक्षरता, आरोग्य, स्वच्छता, लिंगभेद, सामाजिक समस्येबाबत जागरूकता अभियान राबविणे, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास मदत करणे अशा विविध कार्यक्रमात युवकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

यासाठी जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण युवक युवतींकडून यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्याकरिता प्रत्येक तालुक्यात २ उमेदवार अशा एकूण ३२ युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे. तसेच  तालुक्यातील प्रत्येक कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी  २ युवक निवडण्यात येणार आहे.

 

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक  यवतमाळसाठी पात्रता अशी आहे.  

उमेदवार किमान एस.एस.सी.(१० वी ) उत्तीर्ण असवा. उच्च शिक्षण पदवी,पदव्युत्तर व बेसिक संगणक ज्ञान असलेल्यांना प्राधान्य असेल. वय १८ ते २९ (१ एप्रिल २०२३) रोजी १८ वर्षे पूर्ण व २९ वर्षापेक्षा कमी नसावे. उमेदवाराकडे स्मार्ट मोबाईल फोन व त्याचे विविध ॲप संबंधित बेसिक माहिती ई-बँकिंग, डिजिटल, सोशल मीडिया इत्यादी ज्ञान असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. नेहरू युवा केंद्र संघठन सोबत संलग्नीत युवा मंडळाच्या युवकांना प्राधान्य असेल. शिक्षण सुरू असणारे युवक युवती या पदाकरिता पात्र राहणार नाही. मासिक मानधन व प्रवास भत्ता दरमहा ५ हजार राहणार आहे.

तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, ही शासकीय नोकरी नाही. एक-दोन वर्ष कार्य केल्यानंतर या कार्याच्या आधारे नोकरी करता कायदेशीर हक्क दाखविता येणार नाही.

*अर्ज कसा करावा*

नेहरू युवा केंद्र संघठन च्या  संकेतस्थळावर www.nyks.nic.in वर या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.या पोर्टलवर अर्ज दिनांक ९ मार्च २०२३ पर्यंत करू शकता.तसेच ऑनलाईन अर्ज करण्यास काही अडचण येत असल्यास आवश्यक त्या  कागदपत्रासह ८ मार्च २०२३ पर्यंत उमेदवार नेहरू युवा केंद्र कार्यालय चंदन नगर,वडगाव रोड,यवतमाळ या पत्त्यावर अधिक माहिती मिळवू शकतात. अर्जदार ज्या तालुक्याकरिता अर्ज करीत असेल त्या तालुक्यातील रहिवासी असावा आणि त्याच तालुक्यात त्याला काम करावे लागेल. असे जिल्हा युवा अधिकारी,नेहरू युवा केंद्र यांनी कळविले आहे.

ads images

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...