Home / यवतमाळ-जिल्हा / कळंब / माजी आमदार दिवाकर पांडे...

यवतमाळ-जिल्हा    |    कळंब

माजी आमदार दिवाकर पांडे यांचे निधन

माजी आमदार दिवाकर पांडे यांचे निधन

 

-------------------------------------------

यवतमाळ,

येथील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, माजी शिक्षक आमदार, भाजपचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष दिवाकर बळवंत पांडे यांचे १ मार्चच्या रात्री १ वाजून ३० मिनिटांनी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

 

दिवाकरराव पांडे हे राहत असलेल्या बालाजी सोसायटीचे व बालाजी देवस्थानचेही अध्यक्ष राहिले आहेत. येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयातील इंग्रजी व इतिहासाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. सुरुवातीची माध्यमिक शिक्षक परिषद, पुढे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले शिक्षक आमदार म्हणूनही त्यांनी मोठी कामगिरी बजावली. यवतमाळ डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेल्या दिवाकराव पांडे यांचा शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत लौकिक होता. आमदारकीची टर्म संपल्यानंतर ते यवतमाळ जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निवडले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, संघ व अन्य क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे कर्मठ कार्यकर्ते, सामाजिक कामातही हिरीरीने पुढे राहणारे,  विविध विचारांच्या व्यक्ती, संस्था व संघटनांशी निकटचा परिचय असलेल्या दिवाकरराव पांडे त्यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, धनंजय व संजय ही दोन मुले, मंजुषा ही विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.

 

दिवाकरांचे नेत्रदान करण्यात आले. डाॅ. आलोक गुप्ता यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.

 

गुरुवार दिनांक २ मार्च रोजी पांढरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रकांत रानडे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, वसंत घुईखेडकर, प्रवीण देशमुख, जाफरभाई बाॅम्बेवाला, किशोर दर्डा, उद्धव येरमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धासुमन अर्पण केले. दिवाकररावांच्या निधनाबद्दल यवतमाळच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

कळंबतील बातम्या

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" !!वाढदिवस अभिष्टचिंतन !!

"समाजातील उपेक्षित घटकासोबत ओम भाऊ फुटाणे यांचा वाढदिवस साजरा" वाढदिवस अभिष्टचिंतन ✍️ श्रीकांत लोखंडे ...

जीवन प्राधिकरणावरती त्रस्त नागरिकांचा धडक मोर्चा.

भारतीय वार्ता :यवतमाळ शहर (गणेश खडसे ) यवतमाळ- येथील डेहनकर लेआऊट वार्ड क्रं 20 येथे अनेक दिवसा पासुन प्राधिकरणाच्या...