Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / बोगस आश्रम शाळांवर...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

विद्यार्थ्यांना अत्यंत दयनीय दर्जाचा आहार, राहण्याची सुविधा, व शिक्षण मिळत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी

पांढरकवडा: गुरुवार दिनांक  13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील आदिवासी आश्रम शाळा व कार्यालयाने प्रवेशित केलेल्या इतर  पब्लिक स्कूल शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही . निवासाची व्यवस्था नाही, भौतिक सुख सुविधा नाही, जेवन शासनाच्या नियमाप्रमाणे मिळत नाही. मुला मुली करता स्वतंत्र निवासाची व्यवस्था नाही.पुरेशा प्रमाणामध्ये संडास बाथरूमची व्यवस्था नाही.शैक्षणिक दृष्ट्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविल्या जात नाही.गरम पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याला शुद्ध पाणी नाही, झोपायला गादी पलंग नाही, शाळेला संरक्षण भिंत नाही.

भौतिक सुख सुविधा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आदिवासी आश्रम शाळेमध्ये मन रमत नाही. रमनीय शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे ते विद्यार्थी आपल्या गावाकडेच राहतात. तरीपण संस्थाचालक या विद्यार्थ्यांची बोगस हजरी दाखवून शासनाचे करोडो रुपयाचे अनुदान लाटत आहे.

मुंबई हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांनी सुद्धा आश्रम शाळेच्या भौतिक सुख सुविधा संदर्भात तक्रारी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला बोगस आश्रम शाळा संदर्भात दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांच्याकडे संपूर्ण चौकशी अहवाल आला असताना सुद्धा राजकीय दबावापोटी प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, अप्पर आयुक्त अमरावती, आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नाशिकबोगस आश्रम शाळा संदर्भात दंडात्मक कारवाही करायला घाबरत आहे

राजकीय वजन वापरून संस्थाचालक कार्यवाही पासून स्वतःचा बचाव करीत आहे.आदिवासी पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये या संदर्भात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.आदिवासी पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी बोगस आश्रम शाळा वर दंडात्मक कार्यवाही होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री, माननीय आदिवासी विकास मंत्री, माननीय आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांना निवेदन दिलेले आहे.जोपर्यंत बोगस आश्रम शाळा संदर्भात कार्यवाही होत नाही तोपर्यंत आदिवासी पालक व विद्यार्थी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथे आमरण उपोषण करीत आहे.आपणांसमोर मी आदिवासी विद्यार्थी व पालक यांची व्यथा मांडत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.

ads images

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

आज शेतकरी उत्पादक संघ निर्मिती साठी सभा...

पांढरकवडा: शेतकरी उत्पादक संघाची संकल्पना स्पष्ट करणे तसेच सध्या वातावरणातील बदल,जागतिकीकरण ,लागवडीचा खर्चात होत...