Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / आज शेतकरी उत्पादक संघ...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

आज शेतकरी उत्पादक संघ निर्मिती साठी सभा...

आज शेतकरी उत्पादक संघ निर्मिती साठी सभा...

दुपारी २ वाजता सुराणा भवन पांढरकवडा येथे होणार किशोर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली सभा

पांढरकवडा: शेतकरी उत्पादक संघाची संकल्पना स्पष्ट करणे तसेच सध्या वातावरणातील बदल,जागतिकीकरण ,लागवडीचा खर्चात होत असलेली वाढ ,उत्पादनात होत असलेली घट ,तंत्रध्यान ,बाजार स्पर्धा यामुळे एकट्या शेतकऱ्याला शेती करणे कठीण झाले आहे त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरी उत्पादक संघांचे जाळे उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे मात्र महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त भागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आधुनिक शेतीला धरून एकही शेतकरी उत्पादक संघ समर्थपणे उभा राहीलेला नाही सारे FPO हे   पोटभरू एनजीओ ने कागदावर अनुदान खाण्यासाठी सुरु केले आहेत त्यामुळे अशा FPO चा प्रभाव दिसत नाही तरी शेतकऱ्यांच्या जीवनात मूलभूत एकात्मिक परिवर्तन यावा या साठी नियोजीत शेतकरी उत्पादक संघाच्या निर्मितीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पुढाकाराने हा  शेतकरी उत्पादक संघाची स्थापना करण्यात येत आहे यामध्ये  आपला सक्रीय सहभाग पाहीजे आहे .

पश्चिम विदर्भातील कॊरडवाहू कापुस व सोयाबीन उत्पादक आत्महत्या करीत आहेत मात्र मागील पाच वर्षात  दोन वेळा विक्रमी कर्जमाफी ,प्रत्येक वर्षी देण्यात यावरी  नुकसान भरपाई ,पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ,पंतप्रधान सिचन योजना ,पंतप्रधान पीक विमा योजना ,वीज सवलत ,अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,शिक्षण सवलत या सर्व योजना असतांना मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे कुटुंबीय सुद्धा आत्महत्या करीत आहेत,ग्रामीण विदर्भ तसेच मराठवाड्यात काय बिघडले आहे यावर सरकार व प्रशासकीय स्तरावर कोणतीही चर्चा व उपाययोजना होत नाही समस्यांचे जाण नसणारे सनदी अधिकारी वातानुकूल खोलीत बसुन फुकट वाटप योजना ,कागदावर माफी सवलती घोषीत करून मूळ प्रश्न बाजूला ठेवत असल्यामुळे निरपराथ शेतकऱ्यांचे बळी पडत आहेत.नापीकी,निसर्गाचा प्रकोप ,लागवडी खर्चात तसेच घरगुती ,आरोग्य,शिक्षण ,वीजबिल यामध्ये झालेली प्रचंड वाढ त्याच बरोबर उत्पादनात आलेली प्रचंड घट , वारंवार दीलेल्या कर्जमाफीमुळे वंचित शेतकऱ्यांच्या होत असलेल्या यातना ,अपुरे पीककर्ज ,मायक्रोफायनान्स कंपन्यांची राजरोसपणे चाललेली लुट यामुळे ग्रामीण विदर्भात जगणे कठीण झाले आहे.

संकल्पना

विदर्भातील  कृषी व ग्रामीण भागातील आर्थिक ,सामाजिक ,आत्मिक संकट दूर करण्यासाठी खालील मुद्द्यांवर काम करण्याची आवश्यक्यता आहे

१.लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता .बियांचे स्वातंत्र्य

२.पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान

३.सहज मुबलक पतपुरवठा धोरण ,सिबिल व आरबीआय चे शेतकरी विरोधी धोरण व त्यासाठी दबाव गटागटा तयार करणे    

४.नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना

५.न्यप्राण्यांपासुन पिकांचे संरक्षण ,नियमित वीज पुरवड्याचे नियोजन

६.शिक्षण ,आरोग्य ,निवारा ,समाज जीवनमान ,जीवन पद्धती यावर काम करण्यासाठी

जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याची गरज आहे आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया,हळद ,फळे ,मेडिसिनल प्लँट , या पिकांचे नगदी पिकाच्या ठिकाणी नियोजन व  मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा  सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई देणारी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी उत्पादक संघ निर्माण करण्यात येत आहे .

शेतकरी उत्पादक संघाची कामाची रूपरेषा

हा शेतकऱ्यांचा समुह आपले सर्व राजकीय व्यक्तिगत मत हेवेदावे सोडून खालील क्षेत्रात काम करणार आहे

कृषी विषयी खालील  क्षेत्र

१.लागवडीचा खर्च ५० % कमी करणे त्यासाठी जमीन पाणी बीज खत कीटक तण नियंत्रण करणे

२.शेती मधील उत्पादकता १००% वाढविणे

३. शेती मालाला भाव ,प्रक्रीया ,साठवण ,बाजार ,वाहतुक याची जबाबदारी संघाने घेणे

४. पंचवार्षिक पत पुरवडा वेळेवर देणे

५. पीकविमा योजनेचा ,सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दारापर्यंत देणे

६.पीक पद्धतीचे नियोजन ,आलेल्या  पिकांची साठवण ,विक्री

७.शेती वरील जोडधंद्यासाठी प्रशिक्षण व सुरु करून देणे

८.शेतकरी उत्पादक संघाची बाजार विक्री व्यवस्था

९. वीज जोडणी ,वीज पुरवडा यासाठी नियोजन सिंचन व्यवस्था सामुहीक पणे करून देणे .

१०.सर्व शेतकरी उत्पादक संघाच्या सदयस यांना  

ग्रामीण अर्थव्यवस्थेला व समाज जीवनाला उंचावण्यासाठी प्रयन्त

खालील बाबींवर एकात्मिकरीत्या संघटितपणे काम करण्यात येणार आहे

१.आरोग्य सेवा

२.शिक्षण सेवा

३.निवास सेवा

४. तक्रार निवारण व्यवस्था

५.समाज जीवन शैली विकास कार्यक्रम

यावर शेतकरी उत्पादक संघ काम करेल

या व्यतिरिक्त इतर सुचना सुद्धा आमंत्रित आहेत

विनंती

सर्व युवा शेतकऱ्यांनी या शेतकरी उत्पादक संघाची संकल्पना  पूर्ण करण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहन विनंती शेतकरी स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष

किशोर तिवारी यांनी केले.

संपर्क -९४२२१०८८४६

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...