Home / यवतमाळ-जिल्हा / वर्धा नदीवरील मुंगोली...

यवतमाळ-जिल्हा

वर्धा नदीवरील मुंगोली येथील पुलाचे बांधकाम सुरू करा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वर्धा नदीवरील मुंगोली येथील पुलाचे बांधकाम सुरू करा,  विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वर्धा नदीवरील यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंगोली येथील पुलाचे काम  सा.बां.विभागाने त्वरित सुरू करावे असे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सुधिर मुनगंटीवार,

मंत्री वने व संस्कृतीक कार्य मस्त्यविभाग यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, वर्धा नदी मुंगोली येथे राज्य रस्ते विकास महामंडळ व वेकोली वणी एरिया यांनी सामंजस्य करार करून २९१७ मध्ये कोळसा व सार्वजनिक वाहतुकी करिता वर्धा नदीवर चंद्रपूर विभागाकडून विभागाकडून पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलावरून मुंगोली पैनगंगा, कोलगांव खाणीतील कोळसा वाहतूक व मुंगोली, माथोली, कैलास नगर, जुगाड, साखरा, कोलगांव, शिवनी, टाकळी, चिखली, येनक, येनाडी, चनाखा, परमडोह, शिंदोला परिसरातील

नागरिकांची नागरीकांची ये जा   या पुलावरून होत होती. डिसेंबर २०२२ मध्ये या पुलाचा पिल्लर झुकल्या मुळे हा पुल जड वाहतुकिस बंद करण्यात आला.

त्यानंतर वेकोलीने वर्धा नदीवर तात्पुरता पुल बांधण्यात आला.तो पुल  मे २०२३ मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे वाहून गेला. तेव्हा पासून वेकोलीची घुग्गुस येथे येणारी कोळसा वाहतूक शिंदोला शिरपूर मार्गे

घुग्गुस रेल्वे साईडिंग येथे येत असल्याने या परिसरात धुळ,प्रदुर्षण,व रात्र दिवस कोळसा वाहतूकीने रस्त्याची अवस्था दैयनिय झाली आहे.त्याचा त्रास रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना विनाकारण सहण करावा लागत आहे. अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले आहे.

नदीवरील नविन पुलाच्या बांधकामासाठी वेकोलीने एकुण किंमतीच्या ३० टक्के रक्कम चेक द्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांचे कडे जमा केली.

५ महिने होऊन सुद्धा बांधकाम विभागाने अद्यापही नविन पुलाच्या बांधकामासाठी कारवाई केलेली दिसत नाही.तरी या पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...