Home / यवतमाळ-जिल्हा / यवतमाळ जिल्ह्याचे अमृतकलश...

यवतमाळ-जिल्हा

यवतमाळ जिल्ह्याचे अमृतकलश दिल्ली येथील अमृतवाटिकेसाठी रवाना

यवतमाळ जिल्ह्याचे अमृतकलश  दिल्ली येथील अमृतवाटिकेसाठी रवाना

अमृत कलश पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती

यवतमाळ: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत शहरात आज जिल्हास्तरीय अमृत कलश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा पोस्टल मैदान ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या पदयात्रेचा समारोप करुन जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष यांच्या उपस्थितीत अमृत कलश नेणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवून मुंबईला रवाना करण्यात आले.

या पदयात्रेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, महिला व बाल कल्याण अधिकारी प्रशांत थोरात, कार्यकारी अभियंता प्रल्हाद उपाध्ये, माहिती अधिकारी पवन राठोड आदी अधिकारी-कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नेहरू युवा केंद्रांचे विद्यार्थी, महिला ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या हस्ते प्रत्येक तालुक्याचा अमृत कलश प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. या अमृत कलश यात्रेत जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे १६ आणि नगरपरिषदांचा एक असे १७ अमृत कलश घेवून ३४ स्वयंसेवक मुंबई येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी होतील. तेथून विशेष रेल्वेने दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अमृतवाटिका निर्मिती कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत नोडल अधिकारी म्हणून सहायक गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही अमृत कलश पदयात्रा शिस्तबद्धरितीने काढण्यात आली. या पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना विशेष गणवेश देण्यात आले होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थीनींनी लेझीमचे सादरीकरण केले. या अमृत कलश यात्रेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...