Home / यवतमाळ-जिल्हा / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा

यवतमाळ जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा

यवतमाळ जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा जमा

४१ कोटींची पीक विमा नुकसान भरपाई वितरित

यवतमाळ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी ११ लाख रुपयांचा अग्रीम पीक विमा जमा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनादिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा देवून शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. यात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रीम रक्कम अदा करण्याची रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनीने मंजुरी दिली. पीक विमा नुकसान भरपाई रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. दिवाळीपूर्वी ही अग्रीम रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ६६ हजार ९८९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून शेतकऱ्यांच्या ८ लाख ४४ हजार ७५७ अर्जाची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी एकूण ५ लाख २५ हजार ५४१ पीक विमा योजनेच्या स्थानिक आपत्ती जोखीमेअंतर्गत पूर्वसुचना नोंदविल्या आहेत. या प्राप्त पूर्वसुचनांचे पंचनामे करुन रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या पीक विमा अंमलबजावणी कंपनीमार्फत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांना ४१ कोटी १0 लाख रुपये रकमेची विमा भरपाई रक्कम दि.८ व ९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

उर्वरित शेतकऱ्यांच्या पूर्वसुचनांची नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपनीच्या स्तरावरून सुरू असून उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच विमा कंपनीमार्फत लाभाचे वितरण होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...