Home / यवतमाळ-जिल्हा / ‘जाणता राजा’ महानाट्य...

यवतमाळ-जिल्हा

‘जाणता राजा’ महानाट्य तरुणांसाठी प्रेरणादायी -खासदार भावना गवळी

‘जाणता राजा’ महानाट्य तरुणांसाठी प्रेरणादायी -खासदार भावना गवळी

समता मैदानात महानाट्याचे थाटात उद्घाटन

यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जाणता राजा महानाट्य तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी महानाट्याच्या उद्घाटनावेळी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त यवतमाळ येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे ‘जाणता राजा’ या तीन दिवसीय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याचे उद्घाटन खासदार भावना गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, अधीक्षक अमोल पवार, तहसिलदार योगेश देशमुख, कंचन चौधरी, राजू पडगीलवार, शंतनू शेटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवाजी महाराजांचे ३५० वे राज्याभिषेक वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरे केले जात आहे. महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे शौर्य, साहस, पराक्रम, विजयी परंपरा नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी राज्यभर जाणता राजा महानाट्याचे प्रयोग केले जात आहे. आज समता मैदान येथे महानाट्याच्या प्रयोगाला शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक, शिवप्रेमी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, परिसरातील नागरिक परिवारासह उपस्थित होते.

दि.२९ ते ३१ जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस सायंकाळी ६.३० ते रात्री ९.४५ यादरम्यान या महानाट्याचे प्रयोग होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा झेंडा संपूर्ण विश्वात फडकविणाऱ्या महारांजांची किर्ती ‘जाणता राजा’ या नाट्य प्रयोगातून दाखवण्यात येत आहे.

या महानाट्यात महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह शिवराज्याभिषेक सोहळ्याची आकर्षक आतषबाजीचे सादरीकरण करण्यात आले.

‘जाणता राजा’ महानाट्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी केले.

ads images

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...