भारतीय वार्ता : दि 23/10/2021 शनिवार रोजी ग्रामपंचायत उमरी येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण चित्रा चे अनावरण पांढरकवडा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मा. नायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळेस पांढरकवडा पंचायत समिती चे गटविकास अधिकारी चव्हाण साहेब, उमरी ग्रामपंचायत चे उपसरपंच आकाश राठोड, सदस्य प्रकाश जाधव, पोलीस पाटील सचिन पवार, ग्रामसेवक कट्टरवार साहेब,विनेश राठोड, अलीम कुरेशी, सुरेश मारस्कोल्हे,अनिल सातपुते,चरण राठोड, बाळकृष्ण पेंदोर, सुरेश पेंदोर, गजानन चव्हाण, विठ्ठल टेकाम,पुरुषोत्तम उघडे,अमीन कुरेशी,शेषराव पालते,ग्रामस्थ उपस्तित होते.