Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / भारतीय सैन्यदलातील...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

भारतीय सैन्यदलातील सैनिकांना व त्यांच्या परिवाराला शहीद नागेश्वर जिड्डेवार सांस्कृतिक भवन पांढरकवडा ची सेवा निशुल्क देण्यात यावी

भारतीय सैन्यदलातील सैनिकांना व त्यांच्या परिवाराला शहीद नागेश्वर जिड्डेवार सांस्कृतिक भवन पांढरकवडा ची सेवा निशुल्क देण्यात यावी

भारतीय-वार्ता - पांढरकवडा:- पांढरकवडा येथील नगरपरिषद अंतर्गत येणारे सांस्कृतिक भवन. या भवनाला भारतीय सैन्यातील भारतासाठी आपल्या प्राणाची आहुती ज्यांनी दिली व जे मातृभूमी साठी शहीद झाले असे शहीद नागेश्वर जिड्डेवार यांचे नाव देण्यात आले आहे.
खरंच जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय सैन्यदलात भरती होते तेव्हा तो व्यक्ती आपल्या आयुष्याची आहुती देतो.

आपला संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी झिजवून काढतो. वेळ आल्यास आपल्या प्राणाची आहुती देतो. असे अनेक उदाहरण आहेत जम्मूकाश्मीर मध्ये झालेला पुलवामा अटॅक यात जवळपास ४० भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
असे ऎकताच अगदी मन सुन्न होते. काय होत असेल त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या परिवाराचे. हा प्रश्न स्वतःला भारताचे नागरिक म्हणून विचारून पहा. कसे जगत असेल त्यांचे आप्त परिवार??
आपण फक्त वाट्सअँप आणि सोशल मीडिया वरती एक पोस्ट एक स्टेटस ठेवून मोकळे होतो कि भारत मातेसाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आपल्याला भारतीय सैनिकांची आठवण फक्त २६ जानेवारी ला व १५ ऑगस्ट ला येते. त्या नंतर मुळीच नाही मार्मिक आहे पण सत्य आहे. माझे अनेक मित्र भारतीय सैन्य दलात आहे भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सीमेवर आहे.

त्यांच्या सोबत माझं फोन वरती बोलण असते चर्चा असते. माझ्या बऱ्याच सैनिक मित्रांनी मला असं म्हंटल आहे कि जर पांढरकवडा येथील शहीद नागेश्वर जिड्डेवार सांस्कृतिक भवन हे शहीद नागेश्वर जिड्डेवार यांच्या नावावरती आहे तर हे आमच्या सर्व भारतीय सैनिकांसाठी अभिमानास्पद आहे. म्हणून जर शहीद नागेश्वर जिड्डेवार यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ते भवन भारतीय सैनिकांच्या लग्न समारंभासाठी व सैनिकांच्या परिवारातील व्यक्तीसाठी निशुल्क देण्यात यावे. व सैनिकांच्या परिवारातील कोणत्याही कार्यक्रमासाठी सर्वांत पहिले उपलब्ध करून देण्यात यावे. तेव्हाच शहीद नागेश्वर जिड्डेवार यांच्या नावाचे खरे फलित होईल. फक्त सांस्कृतिक भवनाला नाव न देता ते कृतीत करून दाखविण्याची वेळ आली आहे. आणि या साठी मी एक पत्रकार म्हणून नक्कीच पांढरकवडा च्या सैनिकांच्या भावनाचा आदर करून रीतसर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याची मागणी करेल व पाठपुरावा करेल. वेळ पडल्यास आंदोलन सुद्धा करेल.

माझी तमाम पांढरकवडा वासियांना तसेच भारतीय सैनिक प्रेमींना विनंती आहे कि तुम्ही जर आयुष्यात भारतीय सैनिकांवर हृदयापासून प्रेम केलं असेल व त्यांच्या बलिदानाची आहुतीची जाण असेल तर तमाम पांढरकवडा भारतीय सैनिकांच्या सम्मानासाठी माझ्या सोबत या लढ्यात शामिल व्हा तुम्ही सुद्धा प्रचंड ताकतीने निवेदन देऊन मागणी करा.
अशी मागणी पांढरकवडा येथील
पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता परवेज खान
यांनी केली आहे. आणि जो पर्यंत हि मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत लढा सुरु ठेवणार अशी शपथ घेतली. कुठलीही प्रतिक्रिया किव्वा काही सुचायचे असल्यास मला दूरधवनी क्रमांक 9860703777 वर संपर्क करावे असे परवेज खान यांनी म्हंटले आहे.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...