Home / यवतमाळ-जिल्हा / पांढरकवडा / अल्पवयीन मुलीवर बलात्कार,हत्याप्रकरणी...

यवतमाळ-जिल्हा    |    पांढरकवडा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार,हत्याप्रकरणी कारवाई करावी.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार,हत्याप्रकरणी कारवाई करावी.

शीख समाजाकडून निषेध; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन,,

पांढरकवडा:-   तेलंगाणातील हैद्राबाद येथील सुभाष नगर येथे शीख समाजातील अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन पीडितेस चौथ्या मजल्यावरून खाली फेकून तिची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा पांढरकवडा येथील शीख समाजातील नागरिकांनी तीव्र शब्दात
निषेध केला. या सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ
अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. 

अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. हैद्राबाद येथील रंगारेड्डी सुभाष नगर येथील शिख समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर १४ फेब्रुवारी रोजी.रात्री ११ वाजता दरम्यान तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या केली. या घटनेला एका आठवड्या पेक्षा जास्त कालावधी लाटलेला आहे. 

असे असतांना हैद्राबाद पोलिसांनी त्यातील दोषी आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे शिख समाजातून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
हैद्राबाद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जलद गतीने तपास करुन
आरोपीस जेरबंद करून कठोर शिक्षा होण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे
आहे. मात्र, हैद्राबाद पोलिसांचा तपास अतिशय संथगतीने सुरु असल्याने
शिख समाजातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. पांढरकवडा येथील शिख
समाज बांधवांनी या प्रकरणातील दोषीवर तात्काळ कार्यवाही
होण्याकरिता तेलंगाणासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुध्दा निवेदन पाठविले आहे. 

निवेदन देतेवेळी हरपालसिंग चोपडा, जगदिपसिंग काळे, जसविंदरसिंग बिसनसिंघ शिंदो, जितेन्द्रसिंघ कोंघारेकर, भारतसिंघ खिच्ची, बलविंदरसिंघ जुनी, अर्जुनसिंग खिच्ची, सिंधुसिंघ बावरे, मंगलसिंघ बावरे, राजेन्द्रसिंघ जुन्नी, प्रदिपसिंघ जुन्नी, सुखासिंघ जुनघरे, रुपसिंघ चहाल आदी समाज बांधव उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

पांढरकवडातील बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा

पांढरकवडा: आदिवासी विकास विभागाच्या बोगस आश्रमशाळांची कायम स्वरूपी मान्यता रद्द करण्यासाठी तसेच संस्थाचालक यांनी...

बोगस आश्रम शाळांवर कार्यवाही होण्यासाठी प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थी व पालक यांचे आक्रोश आंदोलन

पांढरकवडा: गुरुवार दिनांक 13 जुलै 2023 ला यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम समाजातील बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांनी प्रकल्प...