Home / यवतमाळ-जिल्हा / 'ऑस्कर इन डेंटिस्ट्री'ने...

यवतमाळ-जिल्हा

'ऑस्कर इन डेंटिस्ट्री'ने डॉ अमृता शेंडगे सन्मानित दंतवैद्यक शास्त्रातील मानाचा पुरस्कार

'ऑस्कर इन डेंटिस्ट्री'ने डॉ अमृता शेंडगे सन्मानित दंतवैद्यक शास्त्रातील मानाचा पुरस्कार

यवतमाळ शहरासाठी अभिमानाची बाब

यवतमाळ : दंतवैद्यक शास्त्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा  'फॅमडेंट एक्सलेंस इन डेंटिस्स्ट्री २०२४ या पुरस्काराने यवतमाळ येथील दंतवैद्यक डॉ.अमृता जानकर (शेंडगे) यांना सन्मानित करण्यात आले आहे.२० जानेवारीला मुंबईस्थित एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. दंतशास्त्रातील शैक्षणिक कामगिरी, दंतवैद्यक सेवा तसेच त्यांनी जोपासलेल्या सामाजिक दायित्वाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.जागतिक स्तरावरील या पुरस्काराने यवतमाळ शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

                दंतवैद्यक म्हणून केवळ एक व्यावसायिक पेशा न सांभाळता त्यातून सामाजिक भान जपणाऱ्या दंतवैद्यकांना मागील दहा वर्षांपासून 'फॅमडेंट एक्सलेंस इन डेंटिस्स्ट्री' हा पुरस्कार देऊन गौरविले जाते.या पुरस्काराला 'ऑस्कर इन डेंटिस्ट्री' असेसुद्धा संबोधिले जाते.दंतवैद्यकाची शैक्षणिक कामगिरी,प्रॅक्टिस तसेच सामाजिक पातळीवर उत्कृष्ट कार्य पाहून दरवर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो.यंदा कुवेत,मालदीवसह अन्य आशियायी देशांतील दंतरोगतज्ज्ञांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.या सर्वांना मागे टाकत

यवतमाळ येथील डॉ. अमृता जानकर-शेंडगे यांनी या पुरस्कारावर स्वतःचे नाव कोरले आहे.२० जानेवारीला मुंबई येथील अंधेरी भागातील 'द क्लब' या हॉटेलमध्ये आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते डॉ.शेंडगे यांना पुरस्कृत करण्यात आले. डॉ. अमृता ह्या दंतवैद्यकात पदव्युत्तर तसेच लेझर सर्जरीसह थेरपीमध्ये फेलो असून मागील ६ वर्षांपासून त्या यवतमाळ येथे स्वतंत्र प्रॅक्टिस करतात.११ वर्षांपूर्वी मुंबईवरून त्या यवतमाळ येथे स्थायिक झाल्या.दंतवैद्यकाची प्रॅक्टिस करत त्या  दंत व मुख रोगाशी संबंधित  विविध सामाजिक उपक्रम वा जनजागृतीपर कार्यक्रमातून  दंत व मुखरोगाबाबत जनजागृती व उपचार  करीत आहे. हा पुरस्कार मला जरी जाहीर झाला तरी  या यशात आई, वडील,पती, मुलगी, शेंडगे व जानकर कुटुंब तसेच माझे शिक्षक सहकाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे भावोद्गार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. दंत व मुखाशी संबंधित विविध आजारांबाबत लोकांमध्ये जागरुकता व्हावी तसेच या सेवा कार्यातून अन्य दंत वैद्यकांना प्रोत्साहन मिळावे,या उद्देशातून १९९९ पासून डॉ.अनिल अरोरा यांनी दंतवैद्यकातील जर्नल्स प्रकाशनाला सुरूवात केली त्यांनतर २०१३ पासून हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

ads images

ताज्या बातम्या

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 07 May, 2024

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी...

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही 07 May, 2024

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार 07 May, 2024

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...